रितेश देशमुख पुन्हा एकदा बाबा होणार का? काय आहे या बातमी मागची सत्यता

अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा बाबा होणार आहे अशी बातमी सध्या व्हायरल होत आहे. मराठी आणि बॉलीवूड मधील पावर कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख पुन्हा आईबाबा होणार या चर्चेला अगदी उधाण आले आहे आणि याला कारण ठरला आहे रितेश आणि जेनेलियाचा तो व्हायरल होत असलेला व्हिडिओ. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे कपल तसे नेहमीच चर्चेत असते. दोघांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती त्यावेळेस जेनेलियाचा पर्पल मिनी ड्रेस मधील अंदाजाने चाहत्यांचे जितके लक्ष वेधून घेतले तितकेच रितेश देशमुख चे जेनेलियाचा हात पकडून येणे ही चाहत्यांना लक्ष वेधून घेणारे ठरले. रितेश देशमुख ज्या पद्धतीने जेनेलियाची काळजी घेत होता ते पाहून चाहत्यांनी अंदाज वर्तवला आहे तसेच जेनेलियाने कार्यक्रमादरम्यान पोटावर हात ठेवल्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. आता या बातमीत किती तथ्य आहे हे लवकरच कळेल.

अभिनेता रितेश देशमुख यांचा जन्म लातूरमधील बाभळगाव या गावी झाला. माजी केंद्रीय अवजड उद्योग व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री. विलासराव देशमुख व वैशाली देशमुख यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम चित्रपटाद्वारे रितेश देशमुख याने चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या जेनेलिया डिसुझाला रितेश यांनी आयुष्याचा जोडीदार (पत्नी) म्हणून पसंत केले व २०१२ मध्ये हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार ते जेनेलिया यांच्या सोबत विवाहबद्ध झाले. जेनेलिया या अभिनेत्री असून त्यांनी आजवर अनेक हिंदी व तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.रितेश आणि जेनेलिया यांना २ अपत्य असून रिआन व राहील अशी त्यांची नावे आहेत.

रितेश देशमुख यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत. तसेच, धाकटे बंधू धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत.रितेश यांच्या दोन्ही वहिनी आदिती घोरपडे (आदिती अमित देशमुख) व दीपशिखा भगनानी (दीपशिखा धीरज देशमुख) या देखील चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. मोठ्या वहिनी आदिती यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे तर धाकट्या वहिनी दीपशिखा या स्वतः निर्मात्या असुन सुप्रसिद्ध निर्माते वासू भगनानी यांच्या त्या कन्या आहेत.

तुझे मेरी कसम या चित्रपटानंतर अभिनेता रितेश देशमुख याने मस्ती,  क्या कूल है हम, ब्लफमास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, दे ताली, हाऊसफुल्ल, डबल धमाल, तेरे नाल लव हो गया, हाऊसफुल्ल २, क्या सुपर कूल है हम, ग्रॅंड मस्ती अशा यशस्वी चित्रपटांत त्यांनी काम केले. रितेश याने आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. रितेश विलासराव देशमुख हे मराठमोळं नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक नावाजलेले नाव आहे. करिअरच्या सुरूवातीच्या काळात एक विनोदी अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या ह्या अभिनेत्याने अनेक विविधांगी भूमिका साकारून आपण एक उत्कृष्ट अभिनेता आहोत हे सिद्ध करून दाखवले आहे.

मध्यंतरी आलेल्या काही सिनेमांद्वारे विनोदी कलाकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली. रितेश यांनी २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिका साकारली व ती प्रचंड लोकप्रिय ठरली. जानेवारी २०१३ मध्ये रितेश यांनी पहिल्यांदाच बालक-पालक ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लय भारी चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटांसोबतच रितेश यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलन देखील केले आहे. रितेश यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेश यांनी पटकावले आहेत. अभिनयाशिवाय, सेलेब्रिटी क्रिकेट लीग मधील ‘वीर मराठी’ नावाचा संघ त्यांचा आहे तसेच ते या संघाचे कर्णधार देखील आहेत.

२०२२ मध्ये रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या वेड या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. शिवाय या चित्रपटाने प्रेक्षकांना ही चांगलेच वेड लावले होते. वेड हा चित्रपट भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो रितेश देशमुखी पत्नी जेनेलिया डिसूझा हिने या चित्रपटाची  निर्मिती केली आहे. खर्‍या आयुष्यातील ही जोडी चित्रपटाच्या पडद्यावर मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी ही २०१४ मध्ये आलेल्या लय भारी या मराठी चित्रपटात जेनेलिया यांनी एका गाण्यात हजेरी लावली होती. या चित्रपटाद्वारे रितेश देशमुख यांनी मराठीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती त्यावेळी. अभिनयाशिवाय रितेश देशमुख सामाजिक कार्यात ही सक्रिय असतात. रितेश देशमुख हे युवक बिरादरी (भारत) या राष्ट्रीय पातळीवरील युवा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. रितेश देशमुख यांनी त्यांचे मूळ गाव असलेल्या  लातूर येथे जलयुक्त लातूरसाठी २५ लाख रुपये एवढी देणगी दिली आहे. रितेश आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी अवयव दान करण्याचा निर्यय घेतला आहे.

Leave a comment