मुंबईचे जान आणि महाराष्ट्राची शान म्हणजे वडापाव भूक लागली की वडापाव ची आठवन शहरामध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गापासून ते छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत सर्वांना वडापावची आठवण येत असते. वडापाव बद्दल महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय चालतात सर्वाधिक खाल्ल्या जाणारा हा खाद्यपदार्थ याच्या पाठीमागे शिवसेना आणि वडापाव याचं नातं काय आपण या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत. या वडापाव चा इतिहास पण बघणार आहोत वडापाव नेमका कोणी बनवला आणि कोणत्या शहरांमध्ये वडापाव बनवला गेला हे आपण बघणार आहोत.
वडापाव चा इतिहास (history of vadapav)
वडापाव चटकदार आहे मसालेदार आहे तसाच त्याची याच्या पाठीमागची कहाणी सुद्धा तसेच मसालेदार आहे ,मुंबईमध्ये अशोक वैद्य (founder of vadapav mr ashok vaidya ) यांनी वडापाव पहिल्यांदा बनवला आहे ते आलू वडा विकायचे आणि त्यांनीच वडापाव चा शोध लावला वडापाव पहिल्यांदा मुंबईमध्ये बनवला गेला. वडापाव पूर्ण श्रेय अशोक वैद्य यांना जाते कारण त्यांनी वडापाव क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले आणि अनेक वडापाव ची निर्मिती त्यांनी केलेली आहे. अशोक वैद्य यांनी जो वडापाव बनवला होता तो खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा खाल्लेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते की दक्षिणेमधून येऊन लोक मुंबईत इडली विकत असतील महाराष्ट्रातील मुलांनी वडापाव का विकू नये. बाळासाहेबांच्या प्रेरनेने अनेक मराठी लोकांनी वडापाव बिजनेस चालू केला होता आणि आजही चालू आहे मराठी आणि साऊथ लोकांच्या वादातून वडापाव तयार झालेला आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. उत्पन्न मिळत होतं आणि त्यामुळे अनेक लोकांचे घरे वडापाव या व्यवसायावर चालू लागले तेव्हापासून आज गल्लोगल्ली प्रत्येक शहरात प्रत्येक नाक्यावर ,बाजारपेठेत वडापाव मिळतो आहे आणि चव ही वेगळी वेगळी मिळते आणि वडापाव तुम्हाला सहजपणे भेटतो
वडापाव व्यवसाय का आहे फायद्याचा ?vadapav
विद्यार्थी असो की कामगार असो की आणखी कोणी असो प्रत्येकाला वडापाव भूक लागली की वडापाव सहज भेटणारा आणि कमी किमतीत भेटणार हा पदार्थ असल्यामुळे अनेक लोक आवडीने वडापाव खात असतात वडापावला कुठल्या प्रकारची टेबल खुर्चीची गरज नाही कुठले काटा नाही की माप नाही ची गरज नाही कुठल्याही फ्रीज ची गरज नाही त्यामुळे वडापाव देण्यासाठी आणि ग्राहकांना लवकर खाण्यासाठी सुद्धा सोप आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये पटकन काही खायचं असेल तर वडापाव हा प्रथम प्राधान्य असते।गरीब माणसाचा पिझ्झा ,बर्गर अशी ओळख वडापाव ची आहे , कारण वडापाव आज भारतातच नाही तर बाहेर देशांमध्ये सुद्धा वडापाव खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जम्बो किंग नावाने एक वडापाव माहीतच असेल या वडापाव आंतरराष्ट्रीय दर्जा मान्यता मिळालेली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हा वडापाव खाल्ला जातो, कारण अंके परदेशी लोक सुद्धा चविणे पुणे , मुंबई , नाशिक मध्ये आलेले अनेक परदेशी वडापाव ला खाणे पसंद करतात.
पुण्यातील जोशी वडेवाले,रोहित वडे वाले , साई वडे वाले हे लोकप्रिय वडापाव आहेत , चविणे खाणारे अनेक जन या ठिकाणी गर्दी करतात , कारण चहा सोबत वडापाव खाण्याची आवड अनेकांना आहेच. गोली वडापाव ही तुम्ही कधी पाहिला असेल किंवा खाल्ला असेल या आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवण्याचे काम लोकांनी केलेला आहे,गोली वडापाव शंभर पेक्षा जास्त शहरांमध्ये आज याच्या आउटलेट चालत आहेत आणि हा बिजनेस अंतराष्ट्रीय बाजारात गेला आहे . वडापावची आणखी एक ओळख इंडियन बर्गर अशीही केली जाते ,कारण तरुण आणि कॉलेजमध्ये जाणारे अनेक मुलांसाठी वडापाव हा व्यवसाय होऊ शकतो हे गोली वडापावणे सिद्ध करून दाखवले.शिवसेनेला मुंबईमध्ये कामगार आणि मराठी माणसाने मोठे केले म्हणून अनेक मराठी तरुणांना हा करायला प्रेरित केल . जवळ जवळ 300 ठिकाणी शिव वडापाव हा उद्योग चालू केला होता आजही चालू आहे अनेक मराठी तरुणांना हाताला काम भेटलेले आहे.
वडापाव चा बिझनेस कसा चालू करावा?vadapav
नक्कीच हा ,वडापाव व्यवसाय चालू करण्याचे साधारण खर्च 10 ते 20 हजार आहे या साठी जागा चांगल्या गर्दी च्या ठिकाणी निवड करा कारण वडापाव हा गर्दी मध्ये जास्त विकला जातो जिथे बाजारपेठ , कारखाने आहेत या ठिकाणी ग्राहक् वडापाव खातात. एक वडापाव दहा रुपयाला विकला जातो त्यामध्ये तुम्हाला जवळपास तीन रुपये नफा तुम्हाला भेटू शकतो, म्हणजे साधारण वडापाव मध्ये 40% नफा सहज मिळतो. किंमत 10 ते 15 रुपये ठेवणे चांगले कारण वडापाव ला गरीब आणि श्रीमंत लोक खाणे पसंद करतात , तसेच कामगार आणि विद्यार्थी पॉकेt मनी मधील पैसे खर्च करतात ते ही वडापाव सहज पणे विकत घेऊन खाऊ शकतात . वडापाव बनवण्यासाठी तुम्हाला बेसन, बटाटे, मिरची कोथिंबीर,तेल , गॅस इतर गोष्टीची गरज असते. वडापाव करत असताना वडापाव मध्ये जो पाव आहे तो फ्रेश पाव असेल तर चव उत्तम लागते आणि खाणारे सुद्धा फ्रेश पाव मागतात आणि वडापाव जर चांगल्या प्रकारे तळलेले असतील तर वडापाव नक्कीच लोक चवीने खातील.
व्यवसाय हा साधारणपणे पावसाळ्यामध्ये जर चालू केला तर अधिक उत्तम आह, कारण पावसाळ्यामध्ये वडापाव खूप मोठ्या प्रमाणावर लोक खातात कारण पाऊस असतो आणि गरम वडापाव खाणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली असते त्यामुळे वडापाव व पावसाळ्यामध्ये बिजनेस करू शकतात. बाजारपेठेमध्ये गर्दीमध्ये ,गर्दीच्या ठिकाणी वडापावचा गाडा असेल किंवा शॉप असेल तर वडापाव हा मोठ्या प्रमाणात विकला जातो, अनेकांना भूक लागलेली असते भूक लागल्यानंतर वडापाव सहजपणे मिळणारा पदार्थ असल्यामुळे वडापाव लोक खाणं पसंत करतात. तुमच्या वडापाव जर एखाद्या व्यक्तीला आवडला तर तो व्यक्ती वडापाव खाण्यासाठी स्पेशल त्या ठिकाणी परत परत येऊ शकतो त्यामुळे वडापावची चव चांगली ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. अनेक शिकलेले तरुण देखील वडापाव व्यवसाय मध्ये आज प्रगती करत आहेत आणि उच्चशिक्षित झालेले सुद्धा लोक आज वडापाव बिजनेस करत आहेत कारण खूप छान पैसा या व्यवसायातून मिळत आहे, दिवसाला लाखो रुपये कमवणारे वडापाव उद्योजक महाराष्ट्रामध्ये आहेत ,कारण वडापाव व्यवसायामध्ये कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन तुम्हाला भेटू शकतं आणि ग्राहकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे।
वडापाव रेसिपी (vadapav recipe) vadapav
गरमागरम तळलेला वडापाव सोबत मिरच्या असेल तर प्रत्येक जण वडापाव खाणं पसंत करतात,वडापाव महाराष्ट्रात लोकप्रिय असल्यामुळे वडापाव बनवणे प्रतक मराठी माणसाला माहीत आहे. त्यामुळे अनेक जन घरगुती वडापाव देखील बनवतात .वडापाव बनवण्यासाठी आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची ,लसूण ,हळद ,मीठ , जिरे ,मोहरी , तेल , बटाटे हे सर्व साहित्य लागते . प्रथम सर्व बटाटे उकडून घ्या नीट साल काढून बारीक करून घ्या. आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची ,लसूण पेस्ट बनवून घ्या तसेच आणि चटणी हवी असेल तर शेंगदाणे , जिरे ,लाल मिरची टाकून चटणी बनवा. बटाटे उकडून घ्या बटाटे उकडल्यानंतर त्याला चिलके काढून बटाटे स्वच्छ करून घ्या त्यानंतर थोडेसे तेल घ्या तेल कढईमध्ये टाकून त्यामध्ये थोडे जिरे मोहरी हळद इथे टाकून तुमचा जो मसाला आणि बटाटा आहे याला फ्राय करून घ्या त्यानंतर तुमच्याकडे जे बेसन आहे बेसन घ्या बेसनामध्ये थोडासा तिखट टाका त्यानंतर पाणी टाकून त्याला व्यवस्थितपणे हलवून घ्या. आणि बटाटे मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोल बनवा व्यवस्थित गोल बनवतात त्याला तुम्ही बेसन पिठामध्ये बुडवून नीट घ्या . वडापाव आणखी रुचकर होण्यासाठी शेंगदाण्याचा कूट बनवून त्याची चटणी बनवू शकता. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर बेसन पिठामध्ये वडापाव गोल बनवलेला आहे तो नीट बुडवून त्याला वडापाव व्यवस्थित तळून घ्या. थोड्या मिरच्याही तळून घ्या जेणेकरून वडापाव ची चवही आणखी वाढेल अशाप्रकारे तुमचा वडापाव चविष्ट तयार होईल.
वडापाव चे प्रकार (Types Of Vadapav )
शेव वडापाव
अंडा वडापाव
तंदुरी वडापाव
भारी वडापाव
असे अनेक प्रकारचे वडापाव महाराष्ट्र मध्ये बघायला भेटतात पण यामध्ये साधा वडापाव हा प्रचंड लोकप्रिय असलेला वडापाव आहे.
वडापाव व्यवसायातील नामांकित नाव ( Famous Vadapav in Pune )
अन्सार चाचा वडापाव तुम्हाला प्रसिद्ध वडापाव आहे त्यांचे बोलायची लखप बघून अनेक वडापाव प्रेमी त्या ठिकाणी गर्दी करत असतात आणि नगर मधील हे वडापाव हॉटेल सोशल मेडिया मुळे अनेकांना माहीत झाले आहे. पुणे तिथे काय उणे पुण्यात राहत असाल तर जोशी वडापाव पुण्या मध्ये प्रसिद्ध आहे कारण चव , साफसफाई चांगली आसल्यामुळे गर्दी असते या वडापावला पुण्यातील लोकांची पसंती पहिली असते . Vadapav पुण्यातील ब्रँड वडापाव सुद्धा चाकण शिक्रा पूर रोड वरती असल्याने ठिकाणी चांगली गर्दी आहे या ठिकाणी चांगला वडापाव मिळतो, हिरवी मिरची आणि highway वर वडापाव खाण्याची आवडच न्यारी, बारामती चा वडापाव , जगात भारी वडापाव असे गोली वडापाव असे अनेक वडापाव व्यवसाईक आहेत .