18 वय पूर्ण नसलेले विद्यार्थी UPI कसे वापरू शकतात | माझे वय १८ पूर्ण नाही आहे तर मी UPI कसे वापरू शकतो ?

UPI किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून व्यवहार करण्यासाठी काही वयाच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या वयोमर्यादेच्या खालील व्यक्ती हे UPI व इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर हा पैशांच्या देवाणघेवाणीसाठी करू शकत नाही. त्यासाठी दिलेल्या सूचनांचे व अटीसर तिचे तंतोतंत पालन करावे लागते त्या अंतर्गतच पैशांचे व्यवहार किंवा त्या प्लॅटफॉर्मवर पैशांची देवाणघेवाण होऊ शकते.

मात्र दिवसेंदिवस बऱ्याच वेगवेगळ्या सुविधा पैशांच्या देवाणघेवानी विषयी निघत आहे त्यापैकीच आता काही ॲप्स व प्लॅटफॉर्म हे 18 वर्ष वय पूर्ण नसलेल्या व्यक्तींसाठी पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत.

खाली आपण कोण कोणत्या मार्गाने 18 वर्ष वय पूर्ण नसलेल्या व्यक्ती UPI व्यवहार करू शकतात ते बघणार आहोत.

गूगल पे (Google Pay)

गुगल पे हे ॲप सर्व व्यक्तींना माहीतच आहे, या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपण ऑनलाइन पैशांचे व्यवहार करू शकतो. गुगल पे चे अकाउंट ओपन करताना गुगल पे बँक डिटेल सुद्धा घेत असते व त्यासाठी गुगल पे चा आणि बँकेच्या ज्या शर्ती अटी असतात त्यानुसार हे सर्व चालते.

तुमच्या पालकांचे जे गुगल पे अकाउंट असेल ते तुम्ही पालकांच्या समतीने वापरू शकता मात्र सर्वप्रथम तुम्हाला पालकांकडून गुगल पे च्या सर्व फीचर्स ची माहिती घ्यावी लागेल व त्यानंतरच तुम्ही तुमच्या पालकाच्या परवानगीने त्याच्यावरून व्यवहार करु शकता.

फोन पे (Phon Pay)

फोन पे हा प्लॅटफॉर्म सुद्धा गुगल पे सारखाच आहे, मात्र फोन पे हा प्लॅटफॉर्म गुगल पे येण्याअगोदर पासून बाजारामध्ये आहे. फोन पे वरून सुद्धा तुम्ही सामान्यपणे व्यवहार करू शकता ऑनलाइन पेमेंट विषयीच्या सर्व सुविधा फोन पे वरती देण्यात आलेल्या आहे.

विशेष म्हणजे फोन पे वापरणे खूप सोपे आहे यामध्ये कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागला तर तुम्ही लगेच कस्टमर केअरचा नंबर डायल करून त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. फोन पे वापरण्या अगोदर सुद्धा तुम्हाला तुमच्या पालकांची परवानगी घ्यावी लागेल त्यानंतर तुमच्या पालकांनी तुम्हाला दिलेल्या समतीने तुम्ही फोन पे वरून व्यवहार करू शकता.

फॅम पे (Fam pay)

फॅम पे हे एक डिजिटल वॉलेट आहे ज्या वॉलेटमध्ये तुम्ही 18 वर्षाखालील जरी असाल तरीसुद्धा व्यवहार करू शकतात. फक्त याला एकच अट आहे ती अट म्हणजे दिलेल्या स्टेप्सनुसार संपूर्ण अकाउंट ओपनिंग करणे व प्लॅटफॉर्मला हाताळण्याचे कौशल्य , एकदा हे जमल्यास त्यानंतर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर कुठलीही अडचण येणार नाही तुम्ही अगदी सहज रीतीने कुठेही पैशांचे व्यवहार करू शकता. साधारणपणे ज्या विद्यार्थ्यांचे वय हे अठरा वर्षाखालील आहे ते विद्यार्थी या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त वापर करतात व दिवसेंदिवस फॅम पे या प्लॅटफॉर्मचा वापर वाढतच आहे.

फॅम पे वापरायला खूप सोपे आहे. या प्लॅटफॉर्म वरती वापर करताना काही अडचण आली तर 24 घंटे प्लॅटफॉर्मच्या टीमकडून सपोर्ट मिळतो. तसेच प्लॅटफॉर्मची डिझाईन ही खूप युजर फ्रेंडली बनवलेली आहे त्यामुळे वापर करताना खूप कमी वेळा अडचण निर्माण होऊ शकते.

Fampay Wallet मधे तूम्ही UPI सुद्धा सेट करु शकता , Fam pay कडून तुम्हाला एक कार्ड मिळते व त्या कार्डवरती तुमचा नंबर असणे सुद्धा आवश्यक नाही. फॅम पे वर नंबर लेस कार्ड वापरून तुम्ही व्यवहार करू शकता ज्यामुळे तुम्हाला कुठलीही वयाची अट नाही.

फॅम पे प्लॅटफॉर्म वापरण्याचे फायदे | Benefits Of Use Fam Pay

फॅम पे प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत तरी कुठलाही धोका संभवलेला नाही, दिवसेंदिवस या प्लॅटफॉर्म वरती वापरकर्त्यांची संख्या ही वाढतच आहे. याच विश्वासामुळे फॅम पे प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढतं आहे.

फॅम पे कस काम करते | How To Work Fam pay

फॅमकार्ड म्हणुन या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत एक सुविधा येते त्या सुविधे मध्ये तूम्ही ज्याप्रकारे तुमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स मारत असतात अगदी त्यासारखेच त्यासारखेच तुम्हाला या कार्डमध्ये प्रीपेड करावे लागते. प्रीपेड केल्यावरती तुम्ही त्या कार्डच्या अंतर्गत खरेदी करू शकता किंवा व्यवहार करू शकता.

फॅमकार्ड मधे तुम्ही किती पैसे टाकता यावरती अवलंबून असते की तुमची खर्च करण्याची मर्यादा काय असेल. जेवढे पैसे तुम्ही त्या अकाउंट मध्ये त्या कार्ड व्दारे जोडाल तेवढे पैसे तुम्हाला खर्च करण्यासाठी नेहमी उपलब्ध असतील, त्याद्वारे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता किंवा आता समजतो वरती खर्च करू शकता.

काही विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या मदतीने सुद्धा फॅम कार्डचा वापर करतात, जेव्हा त्यांना या कार्डसाठी पैसे भरायचे असतील अशावेळी पालकांची मदत होते व त्याद्वारे ते पैसे भरून त्यानंतर खरेदी किंवा खर्च करतात.

Fampay कडून पैसै कसे मिळतात | How To Get Money From Fampay

सुरुवातीला तुम्हाला फॅमकार्ड वर KYC पूर्ण करावी लागेल तसेच तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती रेफरल करून सुद्धा FamCoin मिळउ शकता. तुमच्या मित्रांना प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी जेव्हा तुम्ही आमंत्रित करता तेव्हा तुम्हाला बरेच Rewards सुद्धा Fam Pay कडून Provide केल्या जातात

मी माझे Fam Pay खाते कसे सक्रिय करू शकतो | How To Activate Fam Pay Account

तुमच्या E – Mail ID ने किंवा फोन नंबर नाही तुम्ही तुमचे अकाउंट सक्रिय करून घेऊ शकता किंवा Fam pay या प्लॅटफॉर्मचे Application प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करून त्याद्वारे त्याचे  Access घेउ शकता.

मी Amazon वर फॅम पे वरून कशाप्रकारे पेमेंट करू शकतो | How I Can Pay From Fam Pay To Amazon

इतर कार्ड प्रमाणे तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरती 16 अंकी नंबर तुमच्या कार्डवर मिळत नाही, तो नंबर तुमच्या Fam Pay अकाउंट मध्ये सेव केलेला असतो तुम्हाला साधारणपणे तो नंबर कॉपी करावा लागेल व त्यानंतर तुम्ही तो नंबर अमेझॉन वरती ज्या वस्तू खरेदी केल्या असेल त्यासाठी तिथे पेस्ट करून त्या आधारावर अमेझॉन ला पेमेंट करू शकता.

Fam Pay भारतामध्ये कायदेशीर आहे का | fampay is real or fake ? Is Fam Pay Legal In India

Fam Pay हे किशोरवयीन मुलांसाठी असलेले ॲप व प्लॅटफॉर्म भारतामध्ये कायदेशीर आहे. भारत सरकारने प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्म साठी ज्या सूचना व कायदे आखून दिलेले आहेत त्या सर्व बाबीचे Fampay तंतोतंत पालन करताना दिसून येते.

निष्कर्ष – गुगल पे, फोन पे, फॅम पे हे सर्व ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तयार केलेले डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. सर्व स्तरातील व्यक्ती यांना वापरू शकता मात्र बऱ्याच वेळा जेव्हा 18 वर्षाखालील किशोर वयीन मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याचा प्रश्न येतो तेव्हा बऱ्यापैकी समस्या निर्माण होऊ शकतात, आता त्यावरही तोडगा म्हणुन Fam Pay सारखे प्लॅटफॉर्म हे या किशोरवयीन मुलांना त्यांच्या पालकांच्या मदतीने अकाउंट उघडण्यापासून तर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यास मदत करतात. कोणत्याही प्लॅटफॉर्म मध्ये अकाउंट उघडण्यापूर्वी तसेच कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या विवेकानेच निर्णय घ्यावा.

Leave a comment