नासाडी झालेलं अन्न उचलण्यासाठी लागणार 2 कोटी 30 लाख ट्रक, अन्न वाचवण्यासाठी सात टिप्स वाचा संपूर्ण माहिती

आजची पोस्ट नक्कीच वेगळी असणार आहे पण हे लिहणे गरजच वाटल म्हणून लिहावं वाटलं. अन्न नासाडी किती मोठी समस्या आहे आणि त्यामुळं काय परिणाम होतात हे  पाहिज. एका जागतिक अहवालनुसार 90 कोटी टन अन्न वाया जात आहे 1 टन म्हणजे 1000 किलो अन्न वाया जात आहे. म्हणजे हे अन्न उचल्यासाठी 2 कोटी 30 ट्रक लागतील.यात भारताचा वाटा खूप मोठा आहे जवळपास आपण यातील 10% अन्न फक्त भारत वाया घालत आहे.

  अन्न वाया घालण्यात घर आणि रेस्टॉरंट, लग्नसमारंभ सारखे मोठे कार्यक्रम कारणीभूत आहेत. घरातील, रेस्टॉरंट मधील अन्न सरळ कचऱ्यात जात आहे. ही समस्या खूप मोठी आहे सार्वजनिक चळवळ उभी करून ही समस्या आपण नक्कीच दूर करू शकतो.

भारत 121 नंबर ला आहे भूक निर्देशकात

जगातील भूक निर्देशांक मध्ये आपली अवस्था फार वाईट आहे,जगात गरिबांना एक वेळच नीट खायला मिळत नाही आणि काही लोक प्रचंड प्रमाणात अन्न नासाडी करत आहेत. आज भारतात 7 कोटी लोक गरीब आहेत आणि त्यातही महाराष्ट्रात 2 कोटी गरीब आहेत. अन्न नासाडी म्हणजे आज जो शेतकरी अन्न पिकवत आहे त्याचा ही यात अपमान आणि त्याचें कष्ट आपण वाया घालवत आहोत.

7 मार्गाने अन्न नासवणूक रोखू शकतो.

लग्नसमारंभात होणारी अन्न नासाडी : प्रचंड देखावा करण्याची सवय हेच सर्वात मोठे कारण अन्न नासाडी करण्यासाठी असू शकते. लग्ना मध्ये आपण आवश्यक अन्न न घेता कुणी आग्रह केला की अनावश्यक अन्न ताटात घेतो आणि जास्त झाले की सरळ फेकून देतो या मध्ये आपण त्या लग्ना साठी मुलीच्या बापाची आयुष्य भराची कमाई जात आहे याचा ही विचार करत नाही. लागते तेवढेच अन्न घ्या विनाकारण जास्तीचा आग्रह करून अन्न नासाडी ला हातभार लावू नका. योग्य नियोजन केले की ही होणारी नासाडी नक्कीच थांबू शकते. त्यासाठी काही नियम वाढणाऱ्या टीम ला नक्कीच घालून द्या. लहान मुलाना कमी आणि लागेल इतकेच अन्न द्या. लग्नात जेवतानी अधिकचे जास्त पदार्थ न ठेवता कमी मेनू ठेवा. जास्त मेनू मुळे अन्न नासाडी जास्त होते असे दिसून आले आहे. लग्नात जेवणाची वेळ चुकुवू नका योग्य वेळेला लग्न भोजन चालू करा. कारण अवेळी जेवण केले की जेवण जाणार नाही आणि अन्न नासाडी होईल. अनुभवी शेफ नेमा जेणेकरून अन्न चविष्ठ होईल बेचव अन्न असेल तर तसेंच फेकून दिले जाईल अनेक जण कसे करतात.

घरातील अन्न : घरातील अन्न ताजे आणि कुटुंबातील सदस्यला किती अन्न लागते याचे नियोजन करा. आवश्यक तेव्हड नक्की आहार घ्या पण अन्न वाया जाणार नाही याची काळजी करा.
आहार ची एक चांगली योजना बनवा : या मूळ तुमची आहाराविषयी जागरूकता वाढेल आणि आवश्यक अन्न खरेदी कराल पैसा ही वाचेल आणि अन्न ही वाचेल.

अनावशक खरेदी टाळा: अनेक वेळा आपण आपल्याला आवश्यक आणि पूरक अन्न न विकत घेता अनावश्यक अन्न विकत घेतो. त्यामुळे आवश्यक अन्न विकत घ्या. आणि ठोक खरेदीची गरज नसेल तर ठोक खरेदी टाळा.

अन्नाची योग्य साठवणूक : खराब होणारे अन्न शक्यतो लवकर खाऊन घ्या जसे फळे, भाजीपाला नाहीतर योग्य ठिकाणी ठेवा जास्त दिवस टिकतील अश्या ठिकाणी फ्रिज असेल तर उत्तम.

Expiry ची तारीख माहिती असणे गरजेचे : अनेक वेळा आपण ठोक किराणा माल किंवा अन्य पदार्थ खरेदी करत असतो यामध्ये date expiry आपण कधी बगत नसल्याने वापर न होताच फेकून देतो त्यामुळं expiry date संपण्यापुर्वी वापर करा.

जास्तीत चे अन्न दान करा :भोजन बँक असेल किंवा जे गरीब आहेत अश्या लोक्काना अन्न दान देऊ शकता.यामुळे अन्न नासाडी वाचेल आणि गरजू लोकांची मदत ही होईल.

Leave a comment