Konark Sun temple all information in Marathi : आजच्या लेखामध्ये आपण कोणार्क सूर्य मंदिर याविषयी सर्व माहिती देणार आहे , यामध्ये तुम्हाला कोणार्क सूर्य मंदिराची पार्श्वभूमी इतिहास व सर्व माहिती मिळेल
कोणार्कचे सूर्य मंदिर कोणी बांधले
कोणार्कचे सूर्य मंदिर इतिहासकारांच्या मतानुसार तेराव्या शतकामध्ये बांधलेले आहे. तेव्हा राजा नरसिंह देव हा सत्तेवर होता. नरसिंह देवानेच त्याच्या कार्यकालामध्ये 1236-1264 सूर्य मंदिर उभारले आहे. त्या वेळचा तो एक हिंदू शासक होता व तिथे एक भव्य दिव्य कृती असावी या हेतूने त्या दगडामध्ये कोरलेल्या सूर्य मंदिराचे बांधकाम त्याने त्याच्या कार्यकाळात करून घेतले.
कोणार्क सूर्य मंदिराविषयी दंतकथा
Legend about Konark Sun temple कोणार्कचे सूर्य मंदिर बांधण्यासाठी जवळपास बाराशे कामगार दिवस-रात्र कष्ट घेत होते. परंतु राजाने मंदिर बांधण्यासाठी जी ठराविक मुदत दिली त्या मुदतीमध्ये मंदिर बांधून पूर्ण झालं नाही तर राजा बाराशे कामगारांना ठार मारण्यात येईल असं पत्रक काढतो , व होतेही तसेच दिलेल्या कालावधीमध्ये मंदिराचे काम पूर्ण होत नाही . त्यावेळी मुख्य मंदिर स्थापत्याचा बारा वर्षाचा मुलगा ज्याचे नाव धर्मव्रत होते तो मंदिराच्या शिखरावर जाऊन उडी मारतो व त्याच्या प्रानांच एक प्रकारे बलिदान देतो यामुळे बाराशे कामगारांचे जीव वाचतात. तेव्हापासून कोणार्कच्या सूर्य मंदिरामध्ये पूजा केली जात नाही अशी दंतकथा त्या परिसरात प्रचलित आहे.
कोणार्क सूर्य मंदिराची अद्वितीय विशेष स्थापत्य कला
Unique And Great architecture of Konark Sun temple कोणार्कचे सूर्य मंदिर म्हणजे एक खूप मोठा प्रचंड आकाराचा सूर्यरथ आहे. सूर्य मंदिराची मुख्य रचना गर्भग्रह अंतराळ सभामंडप ,जगमोहन मुखमंडप व नाट्यमंडप या रचनेप्रमाणे होती. सूर्य मंदिर उंच ठिकाणी बांधले आहे ,तो उंचवटा दगडाचा आहे त्याच्या दोन्ही बाजूला पण बारा चक्र व प्रत्येक चक्राला आठ आरे आहे. मंदिराच्या भोवती असलेले हे बारा चक्र बारा महिन्याचं प्रतिनिधित्व करतात असं आख्यायिका सांगते. मंदिरासमोर सात भव्य घोडे आहेत ते घोडे सात दिवसांचा प्रतिनिधित्व दर्शवतात. 1903 च्या दरम्यान सभा मंडपाची मोडतोड होऊ नये म्हणून मंदिरांमधील सभा मंडपामध्ये वाळूचा भर देऊन तिन्ही दरवाजे मंदिर प्रशासनाने बंद केले.
कोणार्क सूर्य मंदिरा समोरील प्रेक्षकांना भावणारा नाट मंडप
नाट्य मंडपामध्ये अनेक स्तंभावर वेगवेगळ्या मुद्रा अभिनयातील सुरसुंदरी व नृत्य गायन वादन करण्यात मग्न असलेले नर्तक नर्तकी वादक गायक या सर्वांचे मिळून किमान 277 मूर्ती त्या खांबावर शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून झळकतात. पूर्वीच्या काळी या नाट्य मंडपामध्ये देवदासी तिची कला सादर करून दाखवत असे. या मंडपामध्ये एक स्तंभ अरुण स्तंभ म्हणून परिचित आहे.
कोणार्क सूर्य मंदिराच्या चुंबकीय दगडाचे रहस्य
काही कथांमध्ये कोणार्क सूर्य मंदिराच्या वर एक चुंबकीय दगड आहे व त्या चुंबकीय दगडामध्ये एवढे मजबूत चुंबकीय बल होते की समुद्रातून जाणारा प्रत्येक जहाज स्वतःहूनच मंदिराकडे आकर्षल्या जात असे. परिणामी बऱ्याच जहाजांना त्याचं नुकसानही सोसावं लागलं असाही आख्यायिका सांगतात.
कोणार्क सूर्य मंदिरा विषयी पौराणिक कथा काय सांगतात
पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा सांबा याला कुष्ठरोगाचा शाप मिळाला होता. ऋषी कटक यांनी कुष्ठरोगाच्या प्रतिबंधासाठी भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांबाला मित्र वनातील चंद्रभागा नदीच्या काठावर भगवान सूर्यदेवतेची उपासना करायला सांगितलं . त्यानंतर कृष्णपुत्र सांबाने सूर्यदेवतेची उपासना करायला सुरुवात केली चंद्रभागा नदीच्या काठावर सुमारे बारा वर्षापर्यंत ते सतत सूर्यदेवताची उपासना करत होते. सांबानी केलेल्या या कठोर तपश्चर्येमुळे सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांना कुष्ठरोगातून मुक्त केले. असे सांगण्यात येते की सांबाने चंद्रभागा नदीच्या गर्भाशयामध्ये हे सूर्य मंदिर बांधले असावे . हे संपूर्ण शिल्पकलेने युक्त असलेले सूर्य मंदिर भगवान सूर्य देवाला समर्पित केले गेलेले आहे.
कोणार्क सूर्य मंदिरांतील सूर्यदेवतेच्या प्रतिमा
कोणार्क सूर्य मंदिरामध्ये सध्या तीन सूर्य प्रतिमा लक्ष वेधून घेतात. मुख्य मंदिराच्या दक्षिण उत्तर व पश्चिमेकडील भिंतीमध्ये त्या मूर्ती स्थिरावलेल्या आहेत. या तीन सूर्य प्रतिमा सूर्योदय मध्यान आणि सूर्यास्त या तिन्ही अवस्था दर्शवताना दिसतात. पंधराव्या शतकामध्ये मंदिरावर जे आक्रमण झाले त्या आक्रमणामध्ये मुख्य गर्भ ग्रहातील सूर्य प्रतिमा पुरी येथे नेण्यात आली होती. सद्य परिस्थितीमध्ये ही प्रतिमा नेमकी कुठे आहे , याबद्दलची कोणतीही नोंद नाही.
कोणार्क सूर्य मंदिरांमधील अतुलनीय शिल्पकला
कोणार्क सूर्य मंदिराच्या जोत्यावर व सोबतच 12 चक्र यांच्यावर अगणित मिथुन शिल्प व दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगावर आधारित शिल्प कोरलेले आहे. खजुराहो मंदिराच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिथुन शिल्प हे कोणार्क येथील सूर्य मंदिरावरच बघायला मिळतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्या काळी तिथे तांत्रिक पंथाचा पगडा होता. शिवाय मंदिरावर घोडे ,वाघ ,हत्ती ,सिंह ,पशुपक्षी,जलचर या सर्वांच्या विविध स्वरूपातील प्रतिमा असंख्य कोरल्या आहेत.
कोणार्क सूर्य मंदिर परिसरा भोवतील मंदिर वास्तु व शिल्प
कोणार्क सूर्य मंदिर परिसरामध्ये मुख्यमंत्री व्यतिरिक्त माया देवीचे मंदिर ,बलराम, वराह, वामन त्रिविक्रम या देवतांची जुनी मंदिर आहे. सोबतच शिव, विष्णू, गजलक्ष्मी, श्रीकृष्ण, पार्वती व नरसिंह ह्या पौराणिक कथांतील देवतांच्या मूर्ती सुद्धा आहेत. तर इंद्र, अग्नी, वरून ,कुबेर, आदित्य या वैदिक देवांच्या मूर्ती कोणार्क मधील सूर्य मंदिर परिसरात आहे. भोग मंडप म्हणजेच स्वयंपाक ग्रह ही वास्तूही याला लागूनच आहे.
कोणार्क सूर्य मंदिराचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्व
Importance of Konark Surya Mandir कोणार्क सूर्य मंदिर जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) घोषित झाल्यापासून देश विदेशातून पर्यटक तिथे मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. ओडिसा सरकार व पुरातत्त्व विभाग यांच्यामार्फत त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रात्रीच्या वेळी तिथे लाईट अँड साऊंड शो मोठ्या दिमाखात दाखवल्या जातो. पुरी येथे विमानतळ झाल्यापासून व जवळच रेल्वे स्टेशन असल्यामुळे कोणार्क ला पोहोचणे पर्यटकांसाठी सोयीचं झालेलं आहे.