Jejuri Temple Sampurn Mahiti : जेजूरी मंदिर इतिहास संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील प्रतेक माणसाला जेजूरी आणि तुळजापूर माहीत आहे त्याच कारण ही तसंच आहे मित्र हो लग्न झाले की प्रतेक जन या दोन देवाला जातोच, खंडोबा देवाला इतके महत्व का आहे या लेखात माहिती करून घेऊ जेजूरी नवीन लग्न झालेली जोडपी का जातात असा प्रश्न हमखास अनेकांना पडलेला असतो पण उत्तर माहिती नाही .खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे असे आपण एकूण आहोतच पण हा गड कोणी बांधला आणि इतके महत्व का आहे या गडाचे या लेखात माहिती करून घेऊया . धनगर समाजात खंडोबा देवाची पूजा करतात त्याच बरोबर अनेक दुसऱ्या समाजातील लोक ही खंडोबाची मनोभावे पूजा करतात  आणि दरवर्षी देवदर्शनाला जातात.

खंडोबा मंदिर कोणी बांधले ? ( khandoba mandir koni bandhle )

खंडोबा देवस्थान खूप प्रसिद्ध आहे आणि लाखों भाविक दरवर्षी या ठिकाणी गावखेड्यातून येतात आणि मनोभावे सहकुटुंब दर्शन घेतात या महाराष्ट्रात असे खूप मंदिर आहे ज्याला बारमाही भाविकांची गर्दी असते . मार्तंड भैरव देवस्थानचा हा गड नेमका कोणी बांधला असे जर विचारले तर उत्तर आहे 12 व्या शतकात यादव राजांनी या गडाची निर्मिती केली असा शिलालेख आहे . पुढे नंतर अनेक राजांनी गडाच्या बांधणी साठी योगदान दिले आहे. गडाचा जीर्णोद्धार राघो मांबजी यांनी 1637 साली केला तसेच मल्हारराव होळकर यांनी 1735 गडाचे पुनबांधकाम केले आहे .जेजूरी गड आणि छत्रपती घराने यांचे अतूट नाते आहे अनेक पुरावे बखरीत लिहून ठेवलेले आहेत .

पुण्यावरून जेजूरी गडाकडे कसे जायचे ? ( How To Go Jejuri From Pune )

पुण्यावरून गडाकडे जायला अनेक बस तसेच खाजगी वाहने उपलब्ध आहेत अनेक ठिकाणी खाजगी वाहने भाड्याने उपलब्ध आहेत सासवड रोड वरुण अनेक वाहने जेजूरी कडे जातात . पुण्यापासून जेजूरी ला जाण्यास स्वारगेट , पुणे बस स्थानक , वरुन अनेक बस उपलब्ध आहेत . रेल्वे स्थानकावरून अनेक खाजगी वाहने तसेच बस जेजूरी कडे जातात . पुण्यापासून जेजूरी अंतर 49 किमी आहे जर तुम्ही विमान प्रवासाने आला असाल तर जवळचे विमानतळ लोहगाव आहे विमानतळ परिसरातून अनेक वाहने जेजूरी गडाकडे जातात .साधारणपणे पुण्यावरून जेजूरीकडे जाण्यास 1 तास लागतो , बस प्रवासाने 50 रुपये टीकेट आहे जेजूरी गड दिवसभर गर्दीने भरलेला असतो नवस आणि साकडे फेडायला या ठिकाणी अनेक भाविक येत असतात .पुणे शहर आणि परिसरातील लोकांसाठी हाकेच्या अंतरावर हे मंदिर असल्यामुळे अनेक भाविक प्रतेक महिन्याला दर्शन घेतात त्यामुळे अनेक वाहतूक साधने गडाकडे जाण्यास सहज उपलब्ध होतात .

चंपा षष्ठी म्हणजे काय (खंडोबा यात्रा कधी भरते )

खंडोबा यात्रा पाच दिवस असते आणि चैत्र , पौष ,माघ या महिन्यात असते , गडावर पंचक्रोशीत तिल अनेक् भाविक दाखल होतात . वारीच्या वेळी तर प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला  मिळतात महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या संताच्या पालख्या जेजूरी मुक्कामी असतात त्यामुळे या वेळी प्रचंड गर्दी होत असते . तसेच चंपा षष्ठी हा मार्गशीष महिन्यात शुद्ध  षष्ठी ला साजरा केला जातो . वाघ्या मुरली ला दान धर्म करून ग्रामीण भागातील लोक हा उत्सव साजरा करतात . वांग भरीत आणि भाकर हा खंडोबाचा महत्वाचा नेवेद्य या चंपा षष्ठी ला दाखवला जातो तसेच या दिवशी कुत्र्याची पूजा करून भंडारा लावला जातो .

गड आणि परिसरातील प्रेक्षणीय स्थळे Jejuri temple

जेजूरी गड परिसरात अनेक वास्तु आहेत अनेक भाविक मुक्कामी राहून या सर्व वास्तु चे दर्शन घेतात . खालील काही महत्वाची प्रेक्षणिक स्थळे पाहुयात .

  1. छत्री मंदिर –  माल्हारराव होळकर स्मारक
  2. होळकर तलाव – 18 एकर परिसरात हा सुंदर तलाव आहे या ठिकाणी चहू बाजूनी चिंच वन आहे
  3. जाणाई देवी मंदिर -भव्य आणि सुंदर वास्तू
  4. गायमुख चिलावती कुंड
  5. लवतीर्थ मंदिर
  6. बाजीराव तलाव
  7. मल्हार तीर्थ
  8. जाणाई दरी

म्हाळसा संपूर्ण माहिती (Mhalsa kon hotya )

श्री खंडोबा देवाची प्रथम पत्नी म्हाळसा देवी या होत्या श्री खंडोबा देवस्थान मध्ये या देवीची भव्य मूर्ती  आहे . विष्णु मोहिनी अवतार घेतला होता त्यावेळी श्री शंकर देवाला वचन दिले होते समुद्र मंथन वेळी की मोहिनी रूपाने म्हाळसा म्हणून आपली पत्नी असेल . काही ठिकाणी पार्वती म्हणजेच म्हाळसा देवी आहे . अनेक मालिकामधून ही माहिती आपण सर्वानी पहिली असेल म्हाळसा देवी ला  अनेक भाविक मनोभावे पूजत असतात .

बाणाई संपूर्ण माहिती 

बानाई देवी खंडोबाची दुसरी पत्नी होय खंडोबा देवाने या बानाई देवी सोबत दूसरा विवाह केला होता . श्री बानाई देवी म्हणजे पार्वती देवीची दासी जया आहे तिला पार्वती ने वचन दिले होते की तू खंडोबाची पत्नी बन म्हणून. बानाई म्हणजे काही ठिकाणी धनगराची बानु तर काही ठिकाणी बांनासुराची मुलगी असा उल्लेख आहे बानाई साठी खंडोबा देवाने एक वृद्ध रूप धारण केले होते आणि नंतर लग्न करून जेजूरी घेऊन आले .

खंडोबा देवाला घोडा हे वाहन केव्हापासून आहे

खंडोबाचे वाहन हे घोडा आहे हे आपल्याला माहीत आहे , कारण अनेक फोटो मध्ये श्री खंडोबा देव घोड्यावर बसलेले दिसतात . खंडोबा चे वाहन घोडा आहे पण या मागील कथा अनेक लोकाना माहीत नाही . शंकर मनि युद्ध झाले त्यावेळी चंद्र देवाला घोडा बनावे लागले होते मनी देवाने चंद्र रूपी घोड्याला खंडोबा चे वाहन म्हणून आदेश दिला होता .

Dog Jejuri Temple History

खंडोबा देवाच्या मंदिर परिसरात आणि अनेक फोटो मध्ये कुत्रा  दाखवले आहे , खंडोबा देवाच्या अनेक कथा मध्ये कुत्रा आहे पण या मागील काय कथा आहे समजून घेऊ, श्री कृष्ण देवाने खंडोबा देवाचा आपमान केला होता म्हणून देवाने कुत्रा रूप धारण केले होते तर काही ठिकाणी गरीब धनगर समाजाची मेंढरे खाणाऱ्या वाघाला शाप शाप दिल्यामुळे वाघ कुत्रा झाला अशी एक रूढ कहाणी देखील आहे .

खंडोबाचे उपासक वाघ्या आणि मुरळी संपूर्ण माहिती Jejuri Mandir

खंडोबा देवाच्या अनेक कथामध्ये वाघ्या आणि मुरळी चा उल्लेख आला हे पण हे वाघ्या मुरळी म्हणजे काय आणि काय महत्व आहे हे समजून घेऊ खंडोबाच्या नावसाने अर्पण मुलास वाघ्या म्हणतात तर वाघ्या हा भिक्षा मागून आपली उपजीविका भागवत असतात . अनेक नावसाच्या वेळी वाघ्याला दानधर्म केला जातो. जागरण गोंधळ करण्यासाठी वाघ्या ला महत्वाचे स्थान आहे , वाघ्या पूजा अर्चा करूनआपली उपजीविका भागवत असतात .

मुरळी jejuri temple

खंडोबा सोबत लग्न लावले जाते मुरळी चे त्यामुळे खंडोबा देवास अर्पण केलेल्या मुलिस मुरळी म्हणतात,खंडोबाची गाणी म्हणून आपली आणि जागरण गोंधळात वाघ्या सोबत साथ देऊन आपली उपजीविका करतात .

जागरण गोंधळ म्हणजे काय

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हा जागरण प्रसिद्ध  आहे देवाला आपल्या कुलदेवाला प्रसन्न करण्यासाठी रात्रभर उपासना केली जाते या सर्व विधिला रात्रभर जागावे लागते म्हणून याला जागरण म्हणतात . रात्रभर गायन वादन होते श्री खंडोबा देवाच्या कथा आणि गाणी म्हणत हा विधी रात्रभर चालतो हा जागरण चा कार्यकम खूप जुना आहे 11 व्या शतकापासून याची सुरवात झाली आहे उत्तरपूजा करून ओझे उतरून हा विधी  संपन्न केला जातो आता काहीठिकाणी हा विधी चा कालावधी कमी केला जातो आहे .

सारांश : या लेखात जे श्री खंडोबा बद्दल जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर सर्व भक्त लोकांना ही माहिती शेअर करा , एक वेळ नक्की जेजूरी ला भेट द्या , नवीन लग्न झाले असेल तर एकदा तरी जेजूरी ला जावेच लागते तुमच्या प्रतेकांच्या जीवनात जोडीने जेजूरीला जाण्याचे भाग्य लाभो हीच खंडोबा देवा चरणी प्रथणा करतो.

Leave a comment