कॅनेडियन गायक शुभनीत सिंग वाद काय आहे | कोण आहे गायक शुभनीत सिंग ?

दिवसेंदिवस भारत आणि कॅनडा या दोन देशा दरम्यानचा वाद मिटता मिटत नाहीये. आगीमध्ये आणखी तेल या म्हणीप्रमाणे आणखी एक वाद चव्हाट्यावर आला आहे. Bookmyshow या ॲपने कॅनडामधील सर्व दूर प्रसिद्ध असलेला गायक शुभनीत सिंगच्या (Shubhneet Sing) लाईव्ह कॉन्सर्ट चे ठरलेले तिकीट रद्द केले आहेत.

गायक शुभनीत सिंग वाद काय आहे | what Is Issues About Singer Subhaneet Singh

शुभनीत सिंगने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वर भारताचा चुकीचा नकाशा अपलोड केला होता, यामुळेच एवढा वाद चिघळायला कारण मिळाले. त्याने अपलोड केलेल्या चुकीच्या नकाशामध्ये जम्मू काश्मीर पंजाब व यासोबतच पूर्वांचल मधील राज्यांचा समावेश केलेला नव्हता. शुभनीच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर Unfollow Bookmyshow असा ट्रेंडच चालू झाला.

त्यामुळे स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी व वादामध्ये आणखी गंभीरता निर्माण होण्याअगोदरच बुक माय शो ने शुभनीत सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्ट चे सर्व तिकीट रद्द केले. चोहोबाजूंनी त्याच्यावर टीकेचा वर्षाव झाल्यामुळे सुबनीतने पुन्हा देश प्रेम व्यक्त करणारी पोस्ट इंस्टाग्राम वर टाकली आहे.

हे सुद्धा वाचा : “या” अभिनेत्रींनी आपल्या वयापेक्षा मोठे असणाऱ्या हिरोंची साकारली होती एकेकाळी आईची भूमिका !…

कोण आहे गायक शुभनीत सिंग | Who Is Singer Subhaneet Sing in Marathi

गायक शुभनित सिंग हा मूळचा भारतीय आहे मात्र बऱ्याच कालावधीपासून तो कॅनडातच राहतो. कॅनडा सोबतच भारतामध्ये व इतर देशांमध्ये सुद्धा त्याची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे, तो एक प्रसिद्ध पंजाबी गायक म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये त्याची लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती मात्र त्यादरम्यानच त्याने वादाला तोंड दिले. त्याने भारताचा नकाशा त्याच्या सोशल मीडिया हँडलवर टाकून त्यामधून पंजाब जम्मू काश्मीर व पूर्वांचलची राज्य हा भागच वगळून टाकला त्यामुळे खूप संताप सोशल मीडिया वरती व्यक्त करण्यात आला.

आणखी एक पोस्ट करून शुभणीतने व्यक्त केल भारतावरील प्रेम | Shubhneet Show Love For India After Issues

त्याने समाज माध्यमावर पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली व त्या माध्यमातून भारतावर प्रेम व्यक्त केलं. त्याने त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की पंजाब या प्रांतातून रॅपर व गायकाच्या स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःला बघणे हे माझं स्वप्न होतं. मात्र नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे मी खूप निराश झालो आहे. तो असाही म्हणाला की भारतामधील त्याचा दौरा रद्द झाल्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. तो पुढे लिहितो की मी आपल्या देशामध्ये परफॉर्म करण्यासाठी खूपच उत्साहीत होतो, खूप चांगली तयारी खूप दिवसापासून त्यासाठी करत होतो. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असावं बहुतेक.

त्याने पुढे सांगितलं की भारत माझाही देशच आहे माझा जन्म सुद्धा भारतातलाच, भारताच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या पूर्वजांनी गुरु बलिदान देण्यामध्ये कुठेच कमतरता सोडली नाही. पंजाब तर माझ्या रक्तातच भिनलेला आहे. मी आज जेवढा मोठा व्यक्ती आहे ते फक्त पंजाब मुळेच मला शक्य झालं. इतिहासाच्या प्रत्येक पानावर याचे उदाहरण मिळते की पंजाबी लोकांनी देशासाठी स्वतःचा जीव सुद्धा दिला आहे.

मी ती पोस्ट फक्त पंजाबला प्रार्थना म्हणून केली होती याव्यतिरिक्त माझा कुठला उद्देश नव्हता. कुणाच्याही भावना दुखतील असा मी प्रयत्न केला नाही. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपामुळे मी खरंच खूप निराशेच्या गर्दीत अडकलोय. मात्र मला माझ्या गुरूंची शिकवण आहे सगळी माणसं आपलीच असतात, मी खूप मेहनत करीन आणि मोठा व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करत राहील. याप्रकारे शुभनितने त्याच्या भावना मांडल्या.

सध्याची परिस्थिती बघता भारत व कॅनडा हा वाद अगोदरच चिघळलेला असताना यामध्ये पुन्हा शुभनितने केलेली ही पोस्ट खूप चर्चेमध्ये आहे. मात्र अगोदर भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवायचा व त्यानंतर माफी मागायची त्याच्या या प्रकारावर सोशल मीडियावर नेटकरी खूपच खवळलेले दिसतात.

भारत कॅनडा वाद काय आहे | What Is India Canada Issues in Marathi

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन हे सातत्याने भारतावर लावलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करत असतात. आता पुन्हा एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भारतावर अनेक आरोप केले. मात्र केलेल्या आरोपावर विशेष असं काही सिद्ध होऊ शकलं नाही. आत्ताच हा वाद ताजा असताना पुन्हा कॅनडा स्थित पंजाबी गायकाने भारताच्या नकाशाविषयी केलेली सोशल मीडियावरील छाटछूट हे प्रकरण वेगळ वळण घेता येईल.

मूळचा पंजाब मधील असलेला गायक शुभनित सिंग याने भारतामध्ये सोशल मीडियावर त्याच्याविषयीचा रोष पाहून पुन्हा समाज माध्यमावर दुसरी पोस्ट करून सहानुभूती दर्शवली व सांगितले की त्याचा उद्देश हा दुसऱ्याच्या भावना दुखावणे नसून त्याने पंजाब साठी आदर व्यक्त केला आहे. मात्र नेटकऱ्यांनी त्याला या प्रकरणात दोषी ठरवून त्याच्या विरोधात समाज माध्यमावर ट्रेंड चालवला.

शुभनित सिंगचे करिअर | Shubhneet Sing Career Information in Marathi

शुभनीत सिंगला सुरुवातीपासूनच गायक व्हायचे होते. व त्याने त्या दिशेने पाऊल सुद्धा खूप लहानपणापासूनच उचलली होती. तो लहानपणापासूनच रॅपची व गाणी गायची प्रॅक्टिस करत असायचा . आता सध्यस्थितीत तो प्रसिद्ध गायक आहे , मात्र त्याच्या भारताविषयीच्या चुकीच्या पोस्टमुळे समाज माध्यमावर तो खूपच ट्रोल होत आहे.

शुभनित सिंगचा संघर्ष | Struggle Of Subhaneet Singh

सुरुवातीला गाण्यांमध्ये काम मिळण्यासाठी शुभनितने खूप मेहनत केली आहे. त्याने बऱ्याच इंटरव्यू मध्ये बोलताना सांगितलं की तो दिवस रात्र का मिळण्यासाठी भटकायचा. तो आज ज्या प्रतिष्ठेपर्यंत येऊन पोहोचला आहे तिथपर्यंतचा त्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता असही त्याने सांगितलं . त्याने खूप मेहनत करून व हळूहळू प्रवाहामध्ये येऊन पंजाबी गाणे वर रॅप प्रसिद्ध करायला सुरुवात केली.

सुरुवातीला त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला नाही. मात्र हळूहळू युट्युब वर व तसेच अन्य सोशियल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या चाहत्यांमध्ये हळूहळू वाढ झाली. व त्याच कारणामुळे आज तो त्याच्या करिअरच्या उंच पदावर आहे. त्याच्या मतानुसार तो अजूनही संघर्ष करत आहे व पुढे जाण्यासाठी आणखी मजबूत होण्यासाठी चांगली तयारी करत आहे.

शुभनित सिंग लाईव्ह कन्सर्ट | Shubhneet Sing Live Concert In India

शुभनीत सिंग हा जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन लाईव्ह कन्सर्ट करत असतो. त्याच्या शोच्या माध्यमातून तो खूप प्रसिद्धी मिळवतो, व त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करतो. अगदी त्याच प्रकारे भारतामध्ये म्हणजे त्याच्या आजोळीच त्याच्या गाण्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार होता, मात्र त्याच्या चुकीच्या पोस्टमुळे त्याला खूप मोठं नुकसान सोसावं लागलं व सोबतच त्याच्यावर समाज माध्यमावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली.

सरते शेवटी या प्रकरणामुळे (Bookmyshow) बुक माय शो या प्रसिद्ध साईटला त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट चे तिकीट रद्द करावे लागले. त्याच्या चुकीच्या पोस्टमुळे एवढं सर्व घडलं असा त्याला सर्व स्तरातून दोष देण्यात येत आहे. एवढं असूनही शुभनितने जाहीर रित्या पुन्हा समाज माध्यमावर त्याच्या भावना प्रकट केल्या.

Leave a comment