इस्रो मध्ये भरती कशी होते ,किती पगार मिळतो सर्व माहिती

मित्रांनो खूप दिवसापासून आपण चंद्रयान 3 कधी एकदा चंद्रावर जाईल आणि भारत कधी चौथा देश बनेल चंद्रावर जाणारा आणि  भारतसोबतच दक्षिण द्रुवावर  पोहोचणारा पहिला देश बनेल . भारत चंद्रयान 3 मोहीम पूर्ण केली आहे ,सायंटिस्ट आणि भारतातील सर्व नागरिकांनी एकच जल्लोष केला आणि  भारताचा झेंडा चंद्रावर फडकला आहे. या लेखात इस्रो या अंतराळ संशोधन संस्था मध्ये भरती कशी होते, काय महत्व  आहे , नेमक कोणत शिक्षण घ्याव लागत , पगार किती मिळतो या सर्व बाबीची सविस्तर चर्चा करणार आहोत .

इस्रो कधी स्थापन झाले (ISRO KADHI STAAPN JHALE ) ISRO full form 

इस्रो ला मराठीत (ISRO meaning in marathi )भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन म्हणतात ,तसेच इंग्लिश मध्ये ( ISRO full form in english) Indian Space Research Organization आहे. ISRO स्थापना वर्ष 15 ऑगस्ट 1969 साली झाली आहे , आज 2023 मध्ये इस्रो ला 54 वर्ष पूर्ण झाली आहेत . डिपार्टमेंट ऑफ स्पेस च्या मार्गदर्शनाखाली ही संस्था काम करते . बंगलोर ,कर्नाटक मध्ये इस्रो चे मुख्य कार्यालय आहे , सध्याचे इस्रो चे (isro chairman name ) अध्यक्ष shreedhara somnath (श्रीधर सोमनाथ ) हे आहेत ते केरळ राज्यातील आहेत .विक्रम साराभाई  आणि होमी भाभा यांनी या संस्थेत उभारणीत आणि अंतराळ संशोधन मध्ये मोठी कामगिरी केलेली आहे हे विसरून चालणार नाही .

डॉ विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संस्थेचे जनक मानले जाते , सतीश धवन , राकेश शर्मा ,राजा रामांना , apj अब्दुल कलम आझाद ,म . अण्णादुराई हे सर्व अंतराळ संशोधन संबंधी प्रमुख नावे आहेत .

चंद्रयान 3 मोहीम फायदे (benefits of Chandrayaan-3 mission )

Chandrayaan-3 सॉफ्ट लॅंडींग करणारा भारत अमेरिका, रशिया  , चीन नंतर भारत चौथा देश बनला आहे या मधून भारत एक शक्तिशाली देश आहे हे सिध्द झाले . भारतातील इंजीनीरिंग क्षेत्र किती प्रगत आणि आधुनिक हे सिद्ध झाले आहे , त्यामुळे फायदा असा होणार आहे की अनेक देश भारता सोबत अनेक अंतराळ संशोधन कार्यक्रम राबवतील ज्यातून भारताला आर्थिक फायदा होणार आहे .स्पेस आर्थिक उलाढाल खरब रुपये या मध्ये भारताला आता प्रवेश मिळाला आहे ,खात्रीने भारत या space economy मध्ये मोठे नाव झाले आहे .नवीन संशोधन करण्यासाठी या मिशन मुळे आत्मविशास मिळाला आहे त्यामुळे नवीन उद्योजक या क्षेत्रात उतरतील आणि रोजगार संधि वाढतील .

इस्रो आणि नासा मध्ये कोण आहे सर्वोत्तम (ISRO vs NASA)

NASA full form –National Aeronautics and Space Administration  ही  अमेरिका देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे . नासा ची स्थापना 29 जुलै 1958 रोजी करण्यात आली होती, नासा चे मुख्यकार्यालय वॉशिंग्टन डीसी येथे आहे . आता नासा आणि इस्रो या मध्ये कोण सर्वोत्तम आहे हे पाहणार आहोत मित्र नासा खूप मोठी स्पेस एजन्सि असली तरी आता भारताची नासा सर्वात कमी खर्चात कुठलेही मिशन पूर्ण करते त्यामुळे एक पाऊल आपण पुढे आहोत. मंगल मिशन आपण फक्त 450 कोटी मध्ये पूर्ण केले होते ते एक हॉलीवुड चित्रपट बनवायला लागणाऱ्या पैश्यापेक्षा कमी आहे . भारताने पहिले उपगृह रशिया च्या मदतीने 1975 साली आर्यभट्ट पाठवले होते . त्यानंतर 1980 मध्ये स्वदेशी उपगृह पाठवले होते . 31 jan 1858 रोजी नासा ने पहिले सॅटेलाइट explorer हे  पाठवले म्हणजे भारताच्या आधी नासा ने हे काम केलेले आहे . पण नासाने अनेक दुर्बिण , रोवर  आणि इतर अंतराळ संशोधन इस्रो पेक्षा जास्त केले आहे . इस्रो चे एकूण वार्षिक आर्थिक खर्च नासा पेक्षा 20 पटीने कमी आहे ,  आथिक बाजूने नासा पुढे आहेत ,नासा चे इनफ्रास्ट्रक्चर जरूर पुढे आहे .नासा इस्रो पेक्षा पुढे आहे पण अंतराळ सर्वात कमी खर्चात कुठलेही अंतराळ संशोधन करते . गगनयान द्वारे भारत 3 व्यक्तींना अंतराळ मध्ये पाठवत आहे हे मिशन सुद्धा  कमी खर्चात भारत पूर्ण करणार आहे .

इस्रो मध्ये भरती कशी होते (How to Join In ISRO )

चंद्रयान मिशन पूर्ण झाले जगभरात अनेक टीव्ही चॅनल ही न्यूज दाखवली , भारतात मोठा जल्लोष पाहायला मिळाला अनेक लोकांनी देवाकडे हे मिशन पूर्ण होण्यासाठी पार्थणा सुद्धा केली होती. मिशन पूर्ण झाल्यावर भारताची एक नवीन ओळख निर्माण झाली आणि त्याचबरोबर इस्रो चे नाव सगळीकडे पोहोचले  सोबतच सर्व वैज्ञानिक लोकांचे कौतुक सगळीकडे होऊ लागले .इस्रो मध्ये वैज्ञानिक कसे बनावे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे  आता इस्रो मध्ये वैज्ञानिक कसे भरती होतात , इस्रो मध्ये जाण्यासाठी Bsc , Engineering ,Btech या प्रमुख शाखामधून शिक्षण होने गरजेच आहे . या इस्रो संस्था मध्ये एकूण चार पोस्ट असतात , space scientist , engineers , technical assistant , scientific assistant या पोस्ट साठी भरती होते .

Space scientist 

मध्ये दोन प्रकार आहेत एक physits   आणि एक astronomer असतात . स्पेस वैज्ञानिक (space scientist) होण्यासाठी कुठलेही मिशन पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयोग प्रयोगशाळेत हे space scientist करत असतात पूर्ण ग्रहीतके हे space scientist मांडत असतात .astronomer  हे तारे गृह यांचा अभ्यास करून कुठलेही मिशन कसे पाठवता येईल याचा अभ्यास करतात , आता space scientist होण्यासाठी  बारावीला गणित , फिज़िक्स आणि केमिस्ट्रि हे विषय घ्यावे लागतील . jee main  आणि adavance ही परीक्षा पास झाली कीत्यांतर iist   मध्ये भरती होता येते या मध्ये 140 जागा असतात betch ani integrate betch अश्या दोन पदव्या असतात एक चार वर्षाची आणि एक पाच वर्षाची डिग्री असते पाच वर्षाची डिग्री मध्ये 20 जागा असतात इस्रो मध्ये भरती पूर्वी iist मधील स्कोर बघून मुले निवडली जातात . iist full form indian institute of space science and technology आहे .  या iist संस्थेत पास झालेले सर्व

मुळे पदवी घेऊन इस्रो मध्ये भरती होतात . 

इस्रो मध्ये भरती होण्यासाठी दुसरी पद्धत ICRB FULL FORM- ISRO CENTRALIZED RECRUITMENT BOARD द्वारे भरती होता येते . ICRB द्वारे परीक्षा घेतली जाते तसेच मुलाखत घेतली जाते , या मध्ये सुद्धा तुमच्याकडे BE, BTCH  , BSC, DIPLOMA , BSC या मध्ये शिक्षण पूर्ण केलेले असावे लागते . पदवी परीक्षेत किमत 65 % गुण असणे आवश्यक आहे जर तुम्हाला इस्रो मध्ये जायचे असेल तर , तसेच वय 35 पर्यन्त असावे लागते काही वेळ ही अट नाही . टेक्निकल आणि सायंटिफीक assistant साठी तुमच्या कडे bsc डिग्री पूर्ण असावी लागते ही भरती nit द्वारे कॅम्पस भरती ने केली जाते या मध्ये विज्ञान शाखा मधील पदवी पूर्ण असावी  वय मर्यादा 21 ते 35 वर्ष आहे.

Salary Of ISRO Employee and Scientist  

चंगल्या पगरासोबत नाव आणि सन्मान या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळतो हे सर्वाना माहीत आहे, या मध्ये सायंटिफीक असिस्टेंट या पदासाठी वार्षिक 19 लाख प्रती वर्ष . इस्रो मध्ये इंजीनियर ला 11 लाख प्रती वर्ष आणि इतर भत्ते  सॅलरी मिळते , टेक्निकल असिस्टंट 44900 बेसिक सॅलरी , सायंटिफीक असिस्टंट -44900 बेसिक सॅलरी , लॅब असिस्टंट – 44900 बेसिक सॅलरी  मिळते . सायंटिस्ट आणि इंजीनियर 56100 – 177500 इतकी बेसिक सॅलरी इस्रो मधील सायंटिस्ट ला मिळते , इतर टेक्निकल असिस्टंट कर्मचारी 18000-34000 सॅलरी मिळते .

थोडक्यात पण महत्वाचे 

या लेखात आपण इस्रो मध्ये आपल्या मराठी मुलांना कसे पाठवू शकतो याची थोडक्यात माहिती दिली आहे .सर्व सायंटिस्ट हे साऊथ चे का असतात तर ते ह्या सर्व परीक्षा देत इस्रो मध्ये भरती होतात आपण का ह्या सर्व परीक्षा कडे दुर्लक्ष करत आहोत याचा विचार  करून पुढील  काळात मराठी मुले सुद्धा इस्रो मध्ये काम करताना पाहायला सर्व मराठी लोकांना अवडेल. हा लेख सर्व मराठी मुलांना नक्की पाठवा .

1 thought on “इस्रो मध्ये भरती कशी होते ,किती पगार मिळतो सर्व माहिती”

Leave a comment