India vs Pakistan Match Prediction : आशिया चषकामध्ये भारत व पाकिस्तान या दोन्ही टीम मध्ये पुन्हा लढत होणार आहे. या लढतीमध्ये आता थोडाच वेळ शिल्लक आहे. अगोदरच्या साखळी फेरीमध्ये पावसाने खोडा घातला म्हणून आयोजकांना सामना रद्द करावा लागला होता. भारत पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण क्रीडा जगताचं लागून आहे. रविवारच्या दिवशी या सामन्याला धडाकेबाज सुरुवात होणार आहे.
खेळपट्टी कशी आहे ?
तीन दिवसापासून कोलंबो शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्या कारणामुळेच खेळपट्टी व मैदानावर त्याचा परिणाम झालेला दिसू शकतो. रविवारी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता तेथील हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रेमदासा स्टेडियमची जी खेळपट्टी आहे ती फलंदाजांना चांगली पोषक आहे. मैदानाची आउटफिल्डही गतिशील आहे. म्हणूनच जेव्हा पाऊस उसंत घेईल तेव्हाच तिथे क्रिकेट वीरांच्या धावांचा पाऊस पडेल.
केव्हा व कुठे होणार सामना?
Asia cup India vs pakistan : आशिया कप मध्ये टीम इंडिया व पाकिस्तान या दोन संघामध्ये हायव्होल्टेज सामना 10 सप्टेंबर रोजी रविवारी खेळला जाणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होईल. भारतीय वेळेनुसार या मुकाबल्याची सुरुवात दुपारी तीन वाजता सुरू होईल व या तत्पूर्वी दुपारी 2.30 वाजता नाणेफेक होणार. मात्र एवढं असून सुद्धा सामन्याच्या दरम्यान पुन्हा पावसाचा वेतन येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
भारत – पाकिस्तान सामन्यांसाठी खास राखीव दिवस
भारत व पाकिस्तान यांच्यामधील सामना जर वगळला तर आशिया चषक 2023 मधील स्पर्धेत कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस दिलेले नाहीत. आशिया चषकाच्या शेवटच्या सामन्याला सुद्धा राखीव दिवस नसल्याचे चित्र समोर आल आहे. यामुळेच आशिया चषक स्पर्धा 2023 पुन्हा एकदा चर्चेत आहे. एका वृत्तवाहिनी नुसार शेवटचा सामना व सुपर – 4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. हे दोन्ही सामने ज्यावेळी सुरू होइल त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल असं कळतंय. म्हणूनच सामना छोटा जरी झाला तरी त्याच दिवशी त्याचा शेवट केला जाईल. आणि एवढं सर्व करून सुद्धा जर सामना पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी सामना थांबवला होता त्या क्षणापासूनच सुरुवात करण्यात येईल.
कुणाचं पारडं जड भारत की पाकिस्तान?
भारताचा आणि पाकिस्तानचा सामना म्हणलं की चाहत्यांच्या नजरा ह्या त्या सामन्यावरच खिळून असतात . काही कालावधी पूर्वी एक काळ असा सुद्धा होता जेव्हा भारताची फलंदाजी व पाकिस्तानची गोलंदाजी असा रंगतदार सामना असायचा, पण आता पाकिस्तानच्या तोडीस तोड भारताची गोलंदाजी निर्माण झालेली आहे. व भारताच्या फलंदाजीला आव्हान देणारी भूमिका पाकिस्तानच्या फलंदाजीची आहे. यामुळेच सामना खूप चौरस होईल यात काही शंका नाही. जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे सर्व पाकिस्तानच्या गोलंदाजापेक्षा थोडे पण कमी नाहीत. पाकिस्तानची फलंदाजीही खूप दमदार आहे. बाबर आजम मोहम्मद रिजवान सलमान अली आगा व इमाम उल हक हे सगळे शानदार फॉर्म मध्ये दिसतात. इफ्तीखार सुद्धा जोशात आहे.
या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार ?
आशिया कप स्पर्धा 2023 सुपर चौथ्या फेरीमध्ये टीम इंडियाचा हा पहिलाच सामना रंगेल. साखळी फेरीतील सामना पावसाच्या अत्याधिक प्रमाणामुळे रद्द करण्यात आला होता. त्या आधीच 2022 मध्ये झालेल्या T 20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान टीम इंडिया व पाकिस्तानचे संघ आमने सामने लढले होते. तेव्हा टीम इंडियाने जाम बाजी मारली होती.
भारतामध्ये कधी बघता येणार IND vs PAK सामना ?
टीम इंडिया व पाकिस्तान यांच्यामध्ये जो सामना खेळवण्यात येणार आहे तो महामुकाबला कुंभ भारतात स्टार स्पोर्टस च्या मार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येईल अशी शक्यता आहे.
Asia Cup india Vs pakistan Match लाईव्ह स्ट्रीम फ्री मध्ये कुठे बघता येणार ?
टीम इंडिया व पाकिस्तान यांच्यातील हा रंजक सामना भारतातील प्रमुख OTT platform Disney + Hotstar यावरती विनामूल्य थेट प्रसारित केला जाऊ शकतो. मात्र मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग सुविधा ही फक्त जे मोबाईल युजर्स असतील त्यांच्यासाठीच असेल.
आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा जो कर्णधार आहे. शुभमन गील, विराट कोहली, के एल राहुल ,श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज ,मोहम्मद शमी ,ईशान किशन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर ,सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि अक्षर पटेल हे सर्व भारतीय संघाचा भाग आहे तर संजू सॅमसन ला राखीव मध्ये ठेवलं आहे.
साखळी फेरी मधील India vs Pakistan सामन्याचा Accounting
शनिवारी 2 सप्टेंबरला भारत व पाकिस्तान या दोन्हीमध्ये सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकली व फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या वेगवान तुकडी समोर भारताच्या फलंदाजांची थोडी भंबेरी उडण्याची भीती होती. भारताची आघाडीची फळी ही 15 षटकांच्या आतच वापस फिरली होती. एक वेळ भारताची अवस्था ही 4 बाद 66 एवढी दयनीय झालेली होती. रोहित शर्मा विराट कोहली श्रेयस अय्यर व शुभमन गिल यांनीही स्वस्तात माघार घेतली होती. भारतीय संघ 150 धावा पर्यंत पोहोचू शकतो का एवढी बिकट स्थिती निर्माण झाली होती. मात्र याच वेळी ईशान किशन व हार्दिक पांड्या दोघांनीही दमदार खेळी करत पाचव्या विकेटला 138 धावांची भागीदारी त्यांनी केली. ईशान व हार्दिक या जोड गोळीच्या ताकदीवरच भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल गाठली होती. मात्र त्यानंतर पावसाने मध्येच आळा आणल्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा रविवारी भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होईल. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे सामोरे जातात हे बघणं औत्सुक्याचे ठरेल. आता आगामी 10 सप्टेंबर रोजी भारत व पाकिस्तान या दोन्ही संघाच्या लढतीकडे संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय.