नावी ॲपवर गुंतवणूक न करता पैसे कसे कमवायचे? गुंतवणूक न करता कमाई

नावी ॲपवरुन पैसे कसे कमवायचे | How To Earn Money Fom Navi App Without Investment In Marathi

जर तुम्ही नावी ॲपवर गुंतवणूक न करता पैसे कसे कमवायचे हे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही तुम्हाला या ब्लॉग पोस्टमध्ये नावी ॲप विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत. दुसऱ्याला नावी ॲप रेफर करून तुम्ही कसे पैसे कमवू शकता हे आपण बघणार आहोत. नावी ॲप संदर्भात सर्व महत्त्वाची माहिती इथे मिळेल.

नावी ॲप काय आहे? What Is Navi App

नावी ॲप हे खूप विलक्षण ॲप आहे ते तुम्हाला रेफरल्सद्वारे पैसे कमविण्याची संधी देते. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज द्यायचं काम नाही व नोंदणी फिस सुद्धा देण्याची गरज नाही. तुम्हाला पैशाविषयी काळजी वाटत असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. इथे तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार इतरांना नावी ॲप रेफरल करून भरपूर पैसे कमवू शकता.

Read More : Meesho App वरून पैसे कसे कमवावे 

नावी ॲप वरुन पैसै कमविण्याचे किती मार्ग आहे? How Many Ways To Earn Money From Navi App

नावी ॲप सध्य परिस्थितीमध्ये रेफरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना खूप पैसे देत आहे. या ॲपवरून अनेक मार्गाने तुम्ही पैसे कमवू शकता. पैसे गुंतवून पैसे कमवू शकता सोबतच असेही काही मार्ग आहे ज्यामध्ये काहीही पैसे न गुंतवता तुम्ही भरपूर कमाई करू शकता. तर चला आपण अगोदर रेफर करून कसे पैसे कमवायचे ते बघू. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये नावी ॲप डाऊनलोड करुन घ्यायला हवे. त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या नावी ॲप मधुन रेफरल लिंक तुमच्या मित्रांना शेअर करून त्याद्वारे चांगले पैसे कमवू शकतात. समजा दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या पाच मित्रांना जरी रेफर केले तरी तुम्ही प्रत्येकी रेफर 100 रू कमवू शकता .

नावी ॲप वरुन आपण जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकतो?

हे तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती जणांना नावी ॲप रेफर करता. तुमच्या रेफरन्स द्वारे तुम्ही जेवढ्या लोकांना लिंक शेअर करणार तेवढे अधिक पैसे तुम्ही या ॲपच्या माध्यमातून कमवू शकता. विविध ठिकाणी तुम्ही लिंक शेअर करू शकता तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काम पर्यंत पोहोचून या मार्फत पैसे कमवू शकता.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून कसे पैसे कमवायचे? Earn Money From Mutual fund

मित्रांनो तुम्हाला जवळपास माहित नसेल मात्र तुम्ही नावी ॲप मध्ये फक्त 10 रुपये गुंतवून सुद्धा पैसे कमवू शकता. व जेव्हा तुम्ही ते शिकाल त्यानंतर तुमच्या इच्छेनुसार अधिक पैसे गुंतवून चांगली रक्कम कमवू शकता. या मार्फत तुम्हाला तुमचे भविष्य सुद्धा थोडेसे का होईना सुरक्षित करण्याचा एक मार्ग मिळतो. या ॲपच्या प्लॅटफॉर्म वरून तुम्ही फक्त भारताच्याच नाही तर अमेरिकेच्या बाजारपेठेत सुद्धा गुंतवणूक करून डॉलर्समध्ये तुमची कमाई करू शकता. नावी च्या मदतीने गुगल ,मेटा, एप्पल, मायक्रोसॉफ्ट व इतर अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्ये सुलभतेने तुम्ही गुंतवणूक करू शकता . हे सर्व नावी ने खूप सोयीस्कर केल आहे.

नावी ॲप मध्ये म्युच्युअल फंडाचा पर्याय हा होम टॅब मध्येच दिसतो ज्यावेळी तुम्ही त्याच्यावर क्लिक करून समोर जाल तेव्हा तुम्हाला सर्व माहिती दिसेल . त्यानंतर त्याच्यावर एक बटन असेल त्या बटणावर क्लिक करून तुमचा एक नवीन खाता तुम्ही तिथे तयार करू शकता.

नवी अँप वर म्युच्युअल फंडची नीवड कशी करावी | How To Choose Right Mutual Funds

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही अगोदर बाजारामध्ये असलेल्या म्युच्युअल फंडाच्या कंपन्यांचा अभ्यास करू शकता . कोणत्या म्युचल फंडणे किती कालावधीमध्ये किती नफा कमवला आहे, मार्केट व्हॅल्यू काय आहे, कंपनीची पार्श्वभूमी काय आहे, एकूण कंपनीचे भांडवल काय आहे अशा अनेक गोष्टी तपासून तुम्ही योग्य म्युच्युअल फंड ची निवड करू शकता. यामुळे तुम्हाला अनावश्यक जोखिमपासून दूर राहायला मदत होईल.

सोन्यामध्ये गुंतवणूक करून कसे पैसे कमवायचे? How To Earn Money From Investing In Gold

दिवसेंदिवस सोने या धातूला खूपच महत्त्व मिळत आहे. दर दिवशी आपल्याला सोन्याचे भाव वाढलेले दिसून येतात. हे चक्र नेहमी असंच चालू असतं . मागच्या सात-आठ वर्षांचा जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला तेव्हाच्या आणि आताच्या सोन्याच्या भावामध्ये किती तफावत आहे हे समजेल. म्हणून सोनं किती महत्त्वाच आहे हे अधोरेखित होतं. दर दिवशी त्याच्या किमतीमध्ये सुधारणा होत असतात.

समजा तुम्ही तुमच्या घरी जास्त सोने ठेवत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते. काही व्यक्ती आभूषण व इतर प्रकारच्या स्वरूपात सोना घरी ठेवतात मात्र तरीसुद्धा सोने चोरी जाण्याची किंवा काही कारवाई होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मात्र तुम्हाला जर या सर्व त्रासंपासून जर दूर राहायचं असेल तर तुम्ही नावी ॲप मधे सोन्यात गुंतवणूक करू शकता. त्यामध्ये तुम्ही फक्त 1 रुपयापासून तुमची गुंतवणूक सुरू करू शकता व जास्तीत जास्त लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला नावी ॲप मधे पैशांची गुंतवणूक करून डिजिटल गोल्ड मध्ये जाऊन सोनं खरेदी करावं लागेल , तिथे तुम्ही तुमच्या मोबाईल मधील गुगल पे फोन पे किंवा पेटीएम द्वारे पैसे देऊ शकता.

काही कालावधीनंतर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांचा चांगला परतावा मिळू शकतो. ते निर्धारित करत की तुमच्याकडे किती संयम आहे . कालावधीनुसार जेव्हा तेजी-मंदीच्या काळात सोन्याचे भाव खाली वर होत असतात तेव्हा तुमची रक्कम चांगल्या प्रकारे वाढू शकते व तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

नावी ॲपचे पुनरावलोकन | Navi App Review

तुम्हाला या ॲपमध्ये काळजी करण्याची गरज नाही कारण नावी ॲप हे RBI ने मंजूर केलेले आहे व ते पूर्णपणे सुरक्षित दिसून येते. तुम्ही त्यामध्ये कितीही पैसे गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला या ॲप विषयी आणखी खातर जमा करायची असेल तर तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन NBFC – non banking financial company ची यादी बघू शकता तिथे तुम्हाला अचूकपणे कळेल की कोणते ॲप बनावट आहे व कोणते ॲप सुरक्षित.

Leave a comment