मीशो ॲप वरून पैसे कसे कमवायचे
दर दिवशी या इंटरनेटच्या जमान्यामध्ये नवनवीन पैसे कमविण्याचे ॲप येत असतात, त्यापैकीच आपण कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले मोबाइल ॲप मिशो (Meesho App) विषयी माहिती बघणार आहोत.
मीशो ॲप काय आहे
मीशो हे कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले ई कॉमर्स प्रकारचे ऑनलाईन पैसे कमविण्याचे स्थान आहे. मीशोची स्थापना झाल्यापासून फक्त दोनच वर्षांमध्ये मीशोने संपूर्ण भारतामध्ये जवळपास एक लाख व्यक्ती हूनही अधिक जणांना व्यावसायिक बनवल आहे. मीशोचे मुख्यालय हे बंगळुरू येथे आहे. आज असंख्य व्यक्तीसाठी मीशो हा उपजीविकेचा प्लॅटफॉर्म बनला आहे. व दर दिवशी ही संख्या वाढतच आहे.
Also Read : नवी अँप वर गुंतवणूक न करता पैसे कसे कमवावे
मीशो ॲप चे विशेष फायदे काय ? [Meesho App Benefits]
इथे तुम्हाला कोणत्याही स्वरूपातील इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी तुमच्या स्मार्टफोन वरुन एक रुपयाही न खर्च करता मीशो सोबत व्यवसाय सुरू करू शकता. वेळेचे बंधन नाही , तुम्हाला हव्या त्या मुक्त वेळेमध्ये तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार काम करून हवे तेवढे पैसे कमिशनच्या स्वरूपात मिळवू शकता. तुम्ही कमावलेला कमिशनचा हिस्सा हा सरळ तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतो. त्यामध्ये मागे पुढे अशी दिरंगाई कंपनीकडून केली जात नाही. शिवाय कंपनीच्या वेळेमध्ये तुम्हाला काही मदत हवी असल्यास कंपनीकडून पूर्ण सहकार्य केल्या जाते, ज्यामुळे आणखी काम करण्यासंबंधी तुमच्यामध्ये स्फूर्ती येते.
मीशो ॲप कसे डाऊनलोड करावे?[Download Meesho App]
सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वर जावे लागेल त्यानंतर सर्च बार मध्ये Meesho असे टाईप करून कमांड द्यावी लागेल . खाली लगेच तुम्हाला ॲप मिळून जाईल पुढे ॲप इन्स्टॉल करून ॲपला Agree करावे . त्यानंतर तिथे तुम्ही तुमची प्रोफाइल बनवू शकता व ॲप च्या अटी शर्ती वाचून व्यवसायाला मीशो सोबत सुरुवात करू शकता.
कोणत्या वयोगटातील व्यक्ती मीशो सोबत काम करू शकता?
मित्रांनो कंपनीने यासाठी कुठलीही अट ठेवलेली नाही. कारण सहभागी विक्रेत्यांना यामध्ये कुठलेही शारीरिक श्रम खर्च करण्याची गरज भासत नाही. फक्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचं काम विक्रेते करतात त्यानंतर प्रॉडक्ट निवडण्यापासून ते डिलिव्हरी होण्यापर्यंत या प्रक्रियेमध्ये कंपनी जातीने लक्ष घालत असते. व तुमचे कमिशनही तुम्हाला त्या वेळेमध्ये मिळून जाते.
इतर पैसे कमविणाऱ्या ॲप व मीशोमध्ये काय फरक आहे ?
मीशो वरती तुम्हाला अत्यंत कमीत कमी खर्चामध्ये चांगली दर्जेदार शॉपिंग करता येते. इतर ठिकाणी तुलना करून सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा तुम्ही मीशो वरती खरेदी करू शकता, व तुमची affiliat Link बनवून त्याद्वारे चांगले कमिशन कमवू शकता. इतर ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसा सपोर्ट मिळणे बऱ्यापैकी कठीण जाते. कधीकधी तुम्हाला ठरवलेले कमिशन मिळेल की नाही याचीही शाश्वती बऱ्याच प्लॅटफॉर्मवर राहत नाही. व अशा कारणामुळे तुम्ही घेतलेली मेहनत , श्रम हे कूचकामी ठरतात. जेव्हा मोबदलाच योग्य मिळत नसेल तिथे कष्ट घेऊन काय फायदा. मात्र मीशो वरती तुम्हाला ठरलेले कमिशन ठरलेल्या दिवशी तुमच्या बँक अकाउंट मध्ये मिळून जाते. यामुळे सुद्धा मीशोची लोकप्रियता वाढत चालली आहे. मीशो वरती विक्रेत्यांसोबतच खरेदीदारांचा सुद्धा खूप विचार केला जातो ज्यामुळे विक्रेते व खरेदीदार या दोघांमध्ये चांगला समन्वय निर्माण होऊन मोठ्या कालावधीसाठी व्यवसाय निर्माण व्हायला मदत होते.
मीशो वर पैसे कमविण्यासाठी फॉलोवर ची गरज आहे का ?
नक्कीच तुम्हाला फॉलोवरची अजिबात गरज नाही समजा तुम्हाला सोशल मीडिया वरती कुणी ओळखत जरी नसेल तरीही काही हरकत नाही. या ठिकाणी तुम्हाला मीशो कडून ऑनलाइन माध्यमातून ट्रेनिंगही मिळते की तुम्हाला मीशो वरती वस्तू कशा विकायच्या आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या कौशल्याने व प्रयत्नाने हळूहळू एक चांगली सुरुवात करता तेव्हा तुमचा ग्राहक वर्ग हा आपोआपच वाढत जातो, ज्यामुळे तुम्हाला समोर ग्राहक मिळायला आणखी फायदा होतो. व साखळी पद्धती सारखं एकापासून ते अनेकांपर्यंत तुम्ही मीशो वर असलेल्या सेवा व वस्तू पोहोचवून तुमच्या कमिशनमध्ये अधिक भर घालत असता.
मीशो वर कोणकोणत्या वस्तू विक्रीसाठी उपब्ध आहे?
दैनंदिन वापराच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते सर्व वस्तू मीशो वर आहेत. चप्पल, बूट , विवीध नवनवीन बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तूही मीशो वर हमकास मिळतात.चमकदार कपडे, स्त्रियांसाठी साड्या तसेच सलवार कमीज घरातील उपयोगी वस्तू व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यावं या प्रकारातील जवळपास सर्वच सेवा व वस्तू मीशो वरती आहे. विशेष म्हणजे या सर्व वस्तू इतर ठिकाणी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ज्या किमतीमध्ये मिळतात त्या किमतीच्या कितीतरी कमी पटीत तुम्ही त्या वस्तूंना मीशो वर खरेदी करू शकता , व त्या माध्यमातून बक्कळ कमाईही करू शकता.
व्हाट्सअप च्या माध्यमातून मीशो वरुन पैसे कमवावे?
आज सर्व मोबाईल वापरकर्त्यांकडे मोबाईल मध्ये असंख्य व्हाट्सअप ग्रुप असतातच याचा फायदा तुम्ही मीशो वरील बिजनेस वाढविण्यासाठी करू शकता . जर तुम्ही तुमच्या अंतर्गत कोणत्याही प्रॉडक्ट विषयी माहिती एखाद्या ग्रुप मध्ये टाकली तर त्या ठिकाणहून तुम्हाला खूप ग्राहक तुमच्या सेवेसाठी मिळू शकतात . जाता वापर करून तुम्ही आधीक अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचून तुमच्या वस्तूंचा प्रचार व प्रसार करू शकता व ग्राहकांमध्ये वस्तू विषयी खात्री व विश्वास निर्माण होऊन कायमस्वरूपी तुमच्याकडून दैनंदिन जीवनामध्ये त्यांना उपयोगी असणाऱ्या वस्तू ते मागवतील.
इंस्टाग्राम च्या माध्यमातून मीशो साठी ग्राहक कसे मिळवावे?
असं कोणी शोधूनही सापडणार नाही की जे इंस्टाग्राम वर नाहीत . प्रत्येक जण इंस्टाग्राम वर थोड्या अधिक प्रमाणात तरी ऍक्टिव्ह आहेतच. याचा फायदा तुम्ही तुमच्या मीशो ई कॉमर्स (Meesho E – comerce) व्यवसायामध्ये करून घेऊ शकता . इंस्टाग्राम वर तुमच्या व्यवसायाची एक प्रोफाइल बनवून त्या माध्यमातून तुम्ही ज्या सेवा व वस्तू मीशो च्या माध्यमातून ग्राहकांना विकणार आहात त्याची माहिती देऊ शकता . तसेच पोस्टच्या स्वरूपामध्ये व विविध ट्रेंडिंग इंस्टाग्राम रिल्स च्या स्वरूपातूनही प्रॉडक्टचा प्रसार करू शकता. या ठिकाणी या माध्यमातून तुम्हाला खूप ग्राहक मिळतील ही शक्यता नाकारता येत नाही.