घृष्णेश्वर मंदिराची सविस्तर माहिती, वास्तुकला, रहस्य, वैशिष्ट्ये [ Grishneshwar Temple information in Marathi ]

घृष्णेश्वर मंदिराची माहिती | Grishneshwar Temple information in Marathi

Grishneshwar Temple information in Marathi : महाराष्ट्र मधील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे. खूप प्राचीन काळापासून या मंदिराचे पुरावे इतिहासामध्ये सापडतात. या मंदिराची स्थापना कशी झाली त्या मागच्या पौराणिक कथा काय आहेत व मंदिराचं वैशिष्ट्य तसेच इतिहास आपण या ब्लॉगमध्ये समजून घेऊ. महाराष्ट्र मधील संभाजीनगर जवळच असलेले दौलताबाद येथून घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर हे 11 किलोमीटर आहे. विशेष म्हणजे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे. रतन काळे बौद्ध भिक्षूनी निर्माण केलेल्या एलोरा अजिंठा लेणींच्या प्रसिद्ध गुहा या मंदिराच्या जवळच आहे.

घृष्णेश्वर मंदिराचे इतिहास 

घृष्णेश्वर मंदिराची माहिती : या ज्योतिर्लिंगा बाबतीत पुराणा मध्ये बऱ्याच कथा वर्णन केल्या आहेत. त्यामधील एक कथा म्हणजे तू धर्मा नावाचा एक अत्यंत हुशार बुद्धिमान ब्राह्मण दक्षिण देशामधील देवगिरी पर्वताजवळ त्याच्या धर्मपत्नी सोबत वास्तव्य करत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. मात्र दुर्दैवाने त्यांना मूल बाळ नव्हतं. काही ज्योतिष शास्त्रांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मूल होऊ शकत नाही.

तेव्हा सुदेहाने सुधर्मला दुसरा विवाह करावा असा हट्ट धरला. मात्र सुधर्मला आहे अजिबात मान्य नव्हतं. तरीही पत्नीच्या हट्ट पुढे त्याने तिची धाकटी बहीण घृश्मा तिच्याशी विवाह केला. ती खूप सदाचारी स्त्री होती भगवान शंकराची भक्त होती. ती दररोज भगवान शंकराची आराधना करायची म्हणूनच भगवान शिव यांच्या कृपेने काही दिवसांमध्येच तिच्या गर्भात सुंदर गुटगुटीत बाळाने जन्म घेतला. पुढे ते बाळ जसे जसे मोठे होऊ लागले तसे वाईट विचार सुदेहा च्या मनामध्ये येऊ लागले. तिला असे वाटायला लागले की आत्ता हे सर्व घर पती संपत्ती तिचीच होत आहे व तिला काही किंमत नाही.

एकदा सगळेजण झोपले होते तेव्हा सुदेहाने त्या लहान मुलाला मारून त्याचं शरीर त्याच तलावामध्ये फेकलं जिकडे दररोज घुषमा भगवान शिवाची आराधना करण्यासाठी जात असे. या गोष्टीमुळे सुधर्म खूप रडत असे . घुषमा यादरम्यान अशी वागत होती जणू काही झालेच नाही. एकदा ती ज्या तलावावर भगवान शंकराची आराधना करायला जायची तिथे नित्यनियमाने गेली होती तिथे तिला तिचा मुलगा जिवंत दिसला. तेव्हा भगवान शिव प्रकट झाले व तिला म्हणाले तुला काय वर हवा तो माग. तिने भगवान शंकराला सांगितले की तुम्ही कायमस्वरूपी इथेच निवास करा व लोकांचे कल्याण करा. भगवान शंकराची भक्ती करणाऱ्या या घृष्मा मुळेच पुढे त्या महादेवाच्या पिंडीचे व मंदिराचे नाव घृष्णेश्वर मंदिर असे पडले अशी आख्यायिका आहे.

हे सुद्धा वाचा : कोणार्क सूर्य मंदिराची माहिती, वैशिष्ट्ये, रहस्य 

घृष्णेश्वर मंदिर वास्तुकला | Grishneshwar temple Sculpture

पारंपरिक दक्षिण भारतीय वस्तू कलेचे उत्तम उदाहरण जर काही असेल तर ते म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. मंदिराच्या अंतर्गत भागात कक्ष व गर्भ ग्रह आहे. संपूर्ण मंदिराचा बांधकाम हे लाल लग्नामध्ये झालेला आहे. मंदिराचे बांधकाम 4400 चौरस फूट क्षेत्रावर चोहभागी पसरल आहे. मंदिराच्या भिंतीवर भगवान शिव व विष्णू यांच्या मूर्ती सुबकपणे कोरलेल्या आहेत. मंदिरावर बारीक नक्षीकाम केलेले आहे. नक्षीकाम बघून नक्कीच प्रश्न पडतो की एवढे बारीक कोरीव काम त्याकाळी खरंच कसं शक्य झालं असेल. मंदिराच्या या वैशिष्ट्येमुळेच जगभरातील विविध देशातून लोक मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वर्षभर येत असतात.

घृष्णेश्वर मंदिर जत्रा उत्सव | Ghrishneshwar temple festival

महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भारतभरातून लोक वेरूळला घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. याच कालावधीमध्ये भव्य दिव्य मोठी यात्रा तिथे भरते. ती यात्रा बघण्याजोगी असते. यात्रेमध्ये विविध कला कसरती व सर्व प्रकारातील वस्तू दूर दूरच्या प्रदेशातून विक्रीसाठी उपलब्ध असते. जत्रेच्या काळात मंदिराच्या अवतीभवती जेवढी ही गाव आहेत त्या सर्व गावांमध्ये उत्सवाचे वातावरण असते. जत्रा उत्सवासाठी आसपासच्या सर्व भागातील लोक घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी हजरच असतात. तर काही लोक पायी दिंडीच्या स्वरूपात देखील भगवान शिव शंकराच्या दर्शनासाठी खास योग साधून जातात.

घृष्णेश्वर मंदिराची काही वैशिष्ट्य | Feature of Ghrishneshwar Temple

बौद्ध भिकूंनी कोरलेल्या अजंठा एलोरा या जगप्रसिद्ध लेणी या मंदिराच्या जवळच आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. या मंदिराला अनेक नावं आहे स्थानिक लोक व अनेक लोक या मंदिराला घृष्णेश्वर ग्घुषस्वर या नावाने देखील ओळखतात. मंदिरामुळे मंदिराजवळ असलेले वेरूळ गाव प्रसिद्ध झालेले आहे. वेरूळ चा मंदिर म्हणूनही त्याची एक ओळख बनत आहे. वेरूळ चा मंदिर हे जगातील काही उत्तम वस्तू कलांपैकी एक आहे. कारण हे एक असं मंदिर आहे ज्याची बांधकाम निर्मिती ही कळसाकडून पायाकडे करण्यात आलेली आहे. त्याला वास्तुकलेच्या भाषेत एकसंध दगडामध्ये कोरलेली भव्यदिव्य वस्तू असही म्हणतात.

घृष्णेश्वर मंदिराच रहस्य | The Secret of Ghrishneshwar Temple

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पासून जवळच एक तलाव आहे त्या तलावाचे नाव शिवालय आहे. अशी आख्यायिका आहे की जो कोणी त्या तलावामध्ये आंघोळ करेल त्याला संपूर्ण इच्छापूर्ती होतात. व ज्यांना कुणाला संतान होत नसेल व त्यांनी तिथे जर नवरा बायको जोडीने दर्शन केले तर संतान प्राप्त होते. हा तोच तलाव आहे जिथे घृषमा रोज शिव शंकराची पूजा करण्यासाठी येत असे इथेच तिला शंकरांनी दर्शन दिले होते. तेव्हापासून त्या तलावाचं महत्त्व आजतागायत वाढलेला आहे. जे कुणी भाविक या मंदिरासाठी जातात ते नक्कीच त्या शिवालय च्या पाण्याने स्वतःला मंत्रमुग्ध करतात.

घृष्णेश्वर मंदिर कोणी बनवले

8 शतकामध्ये राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराचे बांधकाम सुरू केले होते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीतच झाले. तो एक राष्ट्रकूट राजा होता. आठव्या शतकामध्ये वेरूळ व सुहबाजुच्या संपूर्ण प्रदेशांमध्ये राजा कृष्णदेवराय याची एक हाती सत्ता होती. सुरुवातीपासूनच त्याचा मंदिर व वास्तू बनविण्याकडे एक कल असलेला दिसून येतो.

घृष्णेश्वर मंदिराला कसे जायचे 

संभाजीनगर शहर हे भारतातील प्रसिद्ध शहर आहे इथे तुम्ही कुठल्याही मोठ्या शहरातून विमान प्रवास करून येऊ शकता. सोबतच जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर मनमाड होऊन जवळपास 22 ते 23 विविध ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे या संभाजीनगर मध्ये रेल्वे स्थानकावरून जातात त्यामार्फत ही तुम्ही संभाजीनगरला येऊ शकता .तिथून मंदिराचा अंतर फक्त 30 किलोमीटर आहे. संभाजीनगर होऊन घृष्णेश्वर मंदिरासाठी खाजगी गाड्या उपलब्ध आहेत. व कमी खर्चात व कमी वेळेत तुम्ही संभाजीनगर होऊन वेरूळ मार्गे घृष्णेश्वर ला येऊ शकता.

घृष्णेश्वर मंदिराच्या आसपास बघण्यासारखी ठिकाण

मंदिरापासून जवळच दौलताबादचा देवगिरी किल्ला आहे. तसेच तिथून जवळच खुलताबाद येथील मारुती ही प्रसिद्ध आहे. वेरूळ मधील एलोरा लेणी तर सिल्लोड तालुक्यातील अजिंठा लेणी संभाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय, बीबी का मकबरा ,सोनेरी महाल या सर्व वस्तू जवळच आहे.

Leave a comment