भारत हा लवकरच अवकाशमय इतिहास रचणार आहे. काही दशका अगोदर जगामध्ये अमेरिकेची NASA ही संस्था जगभर त्यांच्या नवनवीन अवकाश मोहिमेसाठी चर्चेमध्ये राहत असे, मात्र त्याच तोडीला तोड व त्यापेक्षाही अधिक अवकाश मोहिमांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या भारतीय अवकाश मोहीम संस्था ISRO ही सध्या जगभर चर्चेचा विषय आहे.
सातत्याने नवनवीन अवकाश मोहिमा भारतीय अवकाश संशोधन संस्था काढत असते. विशेष म्हणजे ISRO ने काढलेल्या सर्व मोहिमांचे यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे. सद्यस्थितीमध्ये चर्चेत असलेल्या गगनयान या मोहिमेमुळे ISRO पुन्हा चर्चेच्या प्रकाश झोतात आले आहे. या नवीन मोहिमेसाठी इस्त्रोने चांगलीच कंबर कसली, सातत्याने राबवण्यात येणारे नवनवीन प्रयोग व आधुनिक तंत्रज्ञान हेच ISRO च्या यशाचे गमक आहे.
भारताचे गगनयान मिशन काय आहे ? What Is The Gaganyaan Mission
गगनयान [Celestial Vehicle] हे अंतराळामध्ये तीन मानवांना एकत्र घेऊन जाण्यासाठी तयार करण्यात आलेले व विशेष त्यासाठीच डिझाईन केलेले एक आधुनिक दर्जाचे यान आहे. हे अंतराळयान विशेष तंत्रज्ञान वापरून व यामधे वातावरना नुसर बदल घडवून तयार करण्यात आलेले आहे. चंद्रयान – 3 आणि आदित्य एल – 1 या दोन्ही यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्त्रोचे हे अजून एक यशस्वी पाऊल आहे. भारत हा या मोहिमेच्या माध्यमातून अंतराळवीरांना अंतराळात नेण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. येत्या २६ ऑक्टबरला या नवीनतम मोहिमेची चाचणी करण्यात येईल असं सांगितलं जातय.
हे सुद्धा वाचा : इस्रो मध्ये भरती कशी होते ? किती पगार मिळतो सर्व माहिती..
अंतराळवीरांना अंतराळात पाठवताना यानांमध्ये सर्व सुविधायुक्त व्यवस्था असते, मात्र त्या व्यवस्थे पाठीमागे सर्व तंत्रज्ञानाचा व सर्व टीमचा हातभार असतो. खास करून भारत अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील जर संकट उद्भवलं तर त्यावेळी त्या संकटाला कसं हँडल करावं त्यामध्ये कसं पाऊल उचलावं हे सर्व या तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट आहे.
अवकाशामध्ये सुरक्षितपणे ने – आन करण्यासाठी तसेच उद्भवलेली परिस्थिती योग्य रीतीने हाताळण्यासाठी सुद्धा अजुन कोणते तंत्रज्ञान व माहितीचा वापर करून घेता येइल या विषयी ISRO संशोधनात्मक पाऊल उचलत आहे. जेवढे निरीक्षण तंत्रज्ञान उपायोजना व एकंदरीत सुरक्षेच्या सर्व बाबी ठीक असतील तेव्हा गगनयान मोहिमेच्या यशाचा टक्का वाढेल, याच कारणामुळे ISRO या मोहिमेसाठी सर्व प्रयत्न पणाला लावून संशोधकीय प्रयत्न करत आहे.
अवकाश मोहीम कोणत्याही देशाची असो मानवी उड्डाण आकाशामध्ये होण्याअगोदर त्या मोहिमेचे बारीक निरीक्षण gकरून योग्य रीतीने चाचणी घेतली जाते, चाचणीनुसार सर्व निकष सुरक्षित आढळून आल्यावरच मोहिमेला हिरवा झेंडा दाखविण्यात येतो. या मोहिमांच्या चाचण्यामध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट (IADT) व पॅड अबॉर्ट टेस्ट (PAT) यासारख्या मानवविरहित चाचण्या असतात.
गगन यान मोहीम महत्वाची का आहे | Why Gaganyaan Mission Is Important
गगनयान या मोहिमेमध्ये दोन मानव रहित उड्डाण झाल्यानंतर मानवाला अंतराळात घेऊन जाणे शक्य होईल, सुरुवातीला भारतीय अवकाश संशोधन संस्था ही मानव रहित चाचण्या यशस्वी करून दाखवणार आहे व त्यानंतर पार केलेल्या चाचण्यांचे पुनरावलोकन करुन भारतीय अंतराळवीरांना अंतराळात जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात येइल.
स्वबळावर व स्वतःच्या तंत्रज्ञानाने मानवाला अवकाशामध्ये घेऊन जाणारा भारत हा या चाचणीनंतर जगामधला चौथा देश ठरणार आहे. या अगोदर भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे रशियाच्या Soyuz T – 11 या यानाने 3 एप्रिल 1984 ला अंतराळात गेले होते तर अंतराळात प्रथमच जाणारे रशियाचे युरी गाग्रिन हे अंतराळात 108 मिनिट थांबले होते. पुढे अमेरिकेचे नील आर्मस्ट्रॉंग हे 1969 ला अंतराळात गेले होते व त्यांनी प्रथमच चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.
गगन यानाचे वैशिष्टे | Features Of Gaganyaan Mission
गगनयाना मध्ये मानवी मॉडेलचा वापर करण्यात येणार आहे. पृथ्वीपासून वरती ४०० किलोमीटर पर्यंत गगन यान जाणार आहे, गगन्यान या जनाचे एकूण वजन जवळपास 5.3 टन एवढे (12,000 पौंड) आहे. यानाच्या बनावटीनुसार त्यामध्ये तीन मानव एकत्र अंतराळात जाऊ शकता, चाचण्या पार पडल्यानंतर तीन सुसज्ज प्रशिक्षित अंतराळवीर सात दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर परत येतील.
गगन यानाच्या अंतर्गत जीवन प्रणाली तसेच वातावरण नियंत्रण प्रणाली या सुविधा असतील, अचानकपणे मोहिमे दरम्यान काहीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अंतराळवीरांना स्वतःची सुटका करून घेण्यासाठी [Crew Escape System] CSE यानामध्ये प्रणालीत करण्यात आलेली आहे, या परिस्थितीमध्ये यान लगेच थांबवण्यात येइल व अंतराळवीर तिथून लगेच निसटतील, दोन चाचण्या दरम्यान ही चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे.
ISRO चे प्रमुख सोमनाथ यांनी सांगितलंय की पहिल्या चाचणीनंतर दुसऱ्या चाचणीच्या वेळी मानवाला आपण सुरक्षित अंतराळयानात कसं राहू शकतो तसेच अचानकपणे संकट उभ राहिल्यास कस निसटता येईल याची अगोदर चाचणी घेण्यात येईल, व त्यानंतर अंतराळवीर मोहिमेसाठी तयार होऊ शकतात.
गगनयान मोहिमेचा उद्देश काय आहे | What Is The Purpose Of Gaganyaan Mission
गगनयान या मोहिमेचा मुख्य उद्देश हा मानवी उड्डाणांसाठी अगोदर तंत्रज्ञानाची तपासणी करून घेणे मानवासाठी हे तंत्रज्ञान व या मोहीम कशा ठरतील हे सर्व या माध्यमातून जाणून घेणे हा आहे. अंतराळातील सतत बदलत असणार वातावरण अचानक उद्भवणाऱ्या समस्या व परिस्थिती यांना कसं सामोरे जाता येइल किंवा या सर्व परिस्थिती समोर नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे व क्लुप्त्यानद्वारे कसं टिकता येईल हे संपुर्ण अनुभवून घेणे हा सुद्धा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
अवकाशामध्ये अवकाश स्थानक बनवता येईल का त्यासाठी काय पावल उचलता येइल , अन्य इतर अनाभिज्ञ असलेल्या ग्रहांवरती मानवी मोहिमा कशा शक्य होऊ शकतात , आंतरराष्ट्रीय अवकाश संस्था सोबत काम करण्यासाठी यासारखे बरेच उद्देशीय ध्येय समोर ठेवून गगनयान ही मोहीम पार पडत आहे.
गगनयान चाचणी कशा प्रकारे होइल | Gaganyaan Mission Test
आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथे स्थित असलेले सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या चाचण्या होतील, अंतराळ केंद्रावरून उड्डाण केल्यावर ती 16 ते 17 मिनिटामध्ये रॉकेट यानाला पृथ्वीच्या (300 ते 400 किलोमीटर) कक्षेमध्ये नेऊन सोडेल. चाचणीच्या वेळी चाचणीसाठी सर्व तंत्रज्ञान अगदी सुसज्जपणे कार्यरत राहील याची काळजी घेण्यात येईल.
भारताच्या सर्व मोहिमा या आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरूनच पार पडतात, सतीश धवन अंतराळ केंद्र हे भारतासाठी सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. रशियामध्ये गगनयान या मोहिमेसाठी भारताचे अंतराळवीर प्रशिक्षण घेत आहे त्यांचे प्रशिक्षण आता शेवटच्या टप्प्यामध्ये असून लवकरच ते भारतात परततील व मोहिमेस सुरवात होइल.
2035 पर्यन्त जगामध्ये भारताला अंतराळ केंद्र म्हणून ओळख मिळेल | By 2035, India will be recognized as a space hub in the world
चंद्रयान मोहिमेला मिळणारे यश बघुन व आतापर्यंतचे इस्रोला मिळणारे यश बघुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत 2035 पर्यंत जगामध्ये अंतराळ केंद्र म्हणून ओळखल्या जाईल असं म्हंटलय. 2035 पर्यंत अंतराळ केंद्र पूर्णत्वास येईल व त्यानंतर तिथून पुढे चंद्रावरती मानवाला पाठवण्यासाठी मोहिमा आखल्या जातील. प्रामुख्याने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी व तसेच इतर ग्रहांवर सुद्धा संशोधन करण्यासाठी त्या मोहिमांमुळे खूप मदत होइल.