गुंतवणूक करण्या संबंधीत संपूर्ण माहिती | गुंतवणूक करण्याआधी काय खबरदारी घ्यावी ? जाणून घ्या हि आवश्यक माहिती

गुंतवणूक म्हणजे काय | What is investment in marathi

गुंतवणूक म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यवसायासाठी किंवा ज्या स्थानावरून तुम्हाला योग्य परतावा मिळेल अशी खात्री आहे तेथे ठराविक रकमेची गुंतवणूक करणे. यामध्ये तुम्ही तुमच्या अनुभवानुसार एका मर्यादेपर्यंत व यापलीकडेही गुंतवणूक करत असतात. बऱ्याच वेळा इतर कंपनीतही गुंतवणूक करून गुंतवणूकदार गुंतवणूक केलेल्या रकमेवर व्याज किंवा लाभांश मिळवतात. बऱ्याच ठिकाणी आपण इतरांच्या व्यवसायामध्ये सुद्धा गुंतवणूक करून परतावा मिळवू शकतो. व्यवसाय स्वतःचाच असावा असं नाही फक्त गुंतवणूक केलेल्या पैशांवर लाभांश किंवा वाढीव रक्कम मिळणे हे गुंतवणुकीचे ध्येय असतं.

गुंतवणुकीचे किती प्रकार पडतात | Types Of Investments in marathi

प्रामुख्याने गुंतवणुकीचे दोन प्रकार पडतात प्रथम प्रकारामध्ये गुंतवणुकी सोने जमीन खरेदी करणे या भौतिक सुखवस्तू मध्ये केल्या जाते. तर दुसऱ्या प्रकारामध्ये गुंतवणुकी एखाद्या विश्वासू बँकेमध्ये किंवा पोस्टाची बचत योजना असेल पीपीएफ पेन्शन योजना असेल यासोबतच शेअर बाजार, म्युच्युअल फंड हे सर्व गुंतवणुकीच्या दुसऱ्या प्रकारामध्ये येतात. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल हे ठरते . मात्र यासाठी गुंतवणूक करताना बाजाराचा अभ्यास करून व सजगतेने गुंतवणूक करणेही तेवढेच आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : नावी ॲपवर गुंतवणूक न करता पैसे कसे कमवायचे? गुंतवणूक न करता कमाई

फक्त निव्वळ गुंतवणूक म्हणजे काय

निव्वळ गुंतवणुकीमध्ये उत्पन्न हे तुम्ही गुंतवणूक केलेल्या मालमत्तेमधून जे उत्पादन तुम्हाला मिळालेले आहे , ज्यामध्ये कर्ज असेल किंवा यासारखी एखादी तस्सम गुंतवणूक असेल . वैयक्तिक गुंतवणुकीवर किती नफा लाभांश व परतावा तुम्हाला मिळतो यावरती तुमची निव्वळ गुंतवणूक समजते.

शेअर बाजार ही कोणत्या प्रकारातील गुंतवणूक आहे | What Are The Types Of Investment In Stock Market

शेअर बाजार हा गुंतवणुकीमधीलच एक प्रकार आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार एखाद्या विशिष्ट शेअर मध्ये गुंतवणूक करून स्वतः गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी कंपनीचा हिस्सा होतो. जेव्हा एखाद्या कंपनीला बाजारामध्ये तिचं मूल्य वाढवायचं असतं किंवा उत्पादन वाढवायचं असतं त्यावेळी कंपनी शेअर बाजारामध्ये IPO आणून शेअरच्या मार्फत तिचा हिस्सा गुंतवणूकदारांना प्रोव्हाइड करत असते. जेव्हा कंपनी नफा कमवते तेव्हा कंपनीच्या शेअर मध्ये ज्या व्यक्तींनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना लाभांश स्वरूपात देखील परतावा देते. यामध्ये गुंतवणूकदार दोन्ही बाजूने नफ्यामध्ये येऊ शकतो लाभांश व गुंतवणूक केलेल्या रकमेची वाढलेली पट .

सकल गुंतवणुकीचं महत्त्व

एकूण गुंतवणुकीची व्याख्या बघितली तर जेव्हा एखाद्या कंपनीने भांडवली वस्तू प्राप्त करण्यासाठी केलेला सरळ खर्च किंवा सढळ गुंतवणूक म्हणून केली जाते. एकूण गुंतवणूक ही संपूर्ण खर्चाचे ढोबळ मूल्यमापन असते. त्यामध्ये गुंतवणुकीचा घसारा हा घटक विचारात घेतल्या जात नाही.

बाजारामध्ये सर्वात सुरक्षित गुंतवणूक कोणती आहे | What Is The Safest Investment In The Market

बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात सुरक्षित प्रकार कोणते आहे हा प्रश्न असंख्य व्यक्तींच्या मनात नेहमी घोळवत राहतो . मात्र या विलासी जगामध्ये सुरक्षितपणे गुंतवणूक करणे एवढे सोपे सुद्धा नाही. तरी तज्ञांच्या सल्ल्यानुसार बघितलं तर म्युचल फंड व ज्यांचे उत्पादन उच्च प्रतीचा असेल त्यांच्यासाठी बचत खाते हे सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा स्थान अधोरेखित झालेल आहे.

एकूण सर्व गुंतवणुकीमध्ये काय समाविष्ट असते

एकूण गुंतवणुकीमध्ये जर आपण बघितले तर सरकार द्वारे निश्चित केलेल्या मालमत्तेसाठी खर्च समाविष्ट केलेला असतो ज्या खर्चाचा थेट फायदा हा जनतेला होतो. ज्यामध्ये महामार्गाचे बांधकाम असो किंवा सरकारी एजन्सींना त्यांच्या उत्पादित कार्यामध्ये सहभाग असो ज्यामध्ये लष्कराची हार्डवेअरची खरेदी सुद्धा येते.

कोणत्या गुंतवणुकीचा परतावा हा इतर गुंतवणुकी पेक्षा जास्त असतो | Which Investment Has A Higher Return Than Other Investments

संपूर्ण जगामध्ये USA Stock Market हे सर्वाधिक परतावा हा गुंतवणुकीवर देते. हा सर्व आतापर्यंत दिलेल्या परताव्यावर अवलंबून केलेला आलेख आहे. स्टॉकच्या किमती ह्या बॉण्डच्या किमतीपेक्षा खूपच अस्थिर असतात . स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक जर दीर्घकालासाठी असेल तर निश्चितच परतावा चांगलाच मिळेल. कमी कालावधी हा अस्थिरतेचा कालावधी म्हणून ओळखला जातो.

गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट काय असतं 

गुंतवणूक करणारा व्यक्ती कोण आहे यावरती गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरत असते. समजा एखादा व्यापारी जर एखाद्या विशिष्ट समभागांमध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याचा उद्देश हा त्या ठिकाणी चांगला परतावा मिळवणे एवढाच असतो. व एखादा व्यक्ती जर काही भौतिक प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याचा उद्देश हा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा प्रॉपर्टी चे भाव हे गगनाला भेटतील तेव्हा तो त्या मार्फत चांगला नफा कमवेल. तर काही गुंतवणूकदार हे एका पुराव्याच्या आधारावर पैसे देतात व त्या मार्फत त्या पैशावर व्याज मिळवतात. यावरून एवढ समजते की गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुंतवणुकीचे संपूर्ण उद्दिष्ट हे अवलंबून असतात.

गुंतवणूकदार नेहमी पैसे कसे कमवतात

गुंतवणूकदार हे त्यांच्या अनुभवाच्या जोरावर योग्य त्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक केलेल्या रकमेवर त्यांना लाभांश व परतावा दोन्हीही मिळतो. गुंतवणूक करतेवेळी गुंतवणूकदार हे विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात जेणेकरून त्यांना काही क्षेत्रांमध्ये नुकसान झाले तर इतर क्षेत्रात केलेली गुंतवणूक त्यांना परतावा मिळण्यासाठी मदत करते.

व्यापारात गुंतवणूक करून पैसे कसे कमावता येऊ शकतात

कुठल्याही व्यापारामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक करत असलेल्या क्षेत्राचा ढोबळमानाने अंदाज घेऊन त्यानंतर त्याचे निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे असते . बाजारातील मुख्य गुंतवणूकदार हे त्यांच्या अनुभवाचा वापर करून योग्य त्या ठिकाणीच गुंतवणूक करून चांगला परतावा सरासरी मध्ये याच पद्धतीने सातत्याने कमवत असतात.

गुंतवणूक करण्याआधी काय खबरदारी घ्यावी | What To Be Careful Before Investing

जर तुम्ही बाजारामध्ये नवे असाल व तुम्हाला गुंतवणूक करायला शिकायचे असेल तर, सुरुवातीला तुम्हाला थोड्या थोड्या रकमेपासून सुरुवात करता येऊ शकते. यामध्ये तुम्ही सुरुवातीला छोटी छोटी जोखीम घेऊन गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला या काळामध्ये जोखीम व्यवस्थापन करायला जमले तर तुम्ही चांगले गुंतवणूक होण्याची दाट शक्यता असते. हे सर्व तुम्ही कोणत्या प्रकारे गुंतवणूक करता व सुरुवात कशी करता या सर्व बाबीवर ठरते. गुंतवणुकीमध्ये सुरुवातीपासूनच नफा मिळेल हा गैरसमज सर्वप्रथम दूर करायला हवा. बऱ्याच वेळा सुरुवातीला काही अडचणींना सामोरे जाऊन व तिथून आलेल्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला काही कालावधी देण्याची गरज आहे. या संपूर्ण कालावधीत तुमचं निरीक्षण दांडगं असायला हवं . त्या निरीक्षणाच्या आधारावरच तुम्ही गुंतवणुकीमध्ये प्रगती करून चांगलं नाव लवकिक मिळवू शकतात.

गुंतवणूक करण्यासाठी कुणाचा सल्ला घ्यावा

गुंतवणूक करणे हा खूप जोखमीचा प्रश्न आहे कारण तुम्ही केलेली गुंतवणूक ही कुण्या व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा अंदाजावरून करणे चुकीचे ठरेल. येणाऱ्या काळात तुम्ही गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीचा जर परतावा योग्य मिळाला नाही तर तुम्ही संकटात देखील सापडू शकता. म्हणून गुंतवणुकीसाठी इतरांचा सल्ला घेण्याअगोदर स्वतः बाजाराचे वर्तन समजून घेऊन योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करणे कधीही फायद्याचेच ठरेल.

1 thought on “गुंतवणूक करण्या संबंधीत संपूर्ण माहिती | गुंतवणूक करण्याआधी काय खबरदारी घ्यावी ? जाणून घ्या हि आवश्यक माहिती”

Leave a comment