बिटकॉइन’ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या ॲपचा वापर करावा आणि ते कसे सुरक्षित आहे | Safest Bitcoin Platforms For Investment

बिटकॉइन ही एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे. क्रिप्टो करन्सीची निर्मिती ही 2008 मधे झाली, तेव्हापासून आजतागायत सातत्याने क्रिप्टो करन्सीच्या सर्व प्रकारातील वेगवेगळ्या कॉइन विषयी उलट सुलट चर्चा या सुरू असतात. चर्चा होण्यामागे कारणही तसंच आहे, क्रिप्टो करन्सी वरती कुणाचेही नियंत्रण नाही. ती एक अनियंत्रित ब्लॉग चेन सिस्टीम आहे.

ज्याप्रकारे आपण शेअर मार्केटमध्ये काही भाकीत बाजाराचा अभ्यास करून काढू शकतो व त्या आधारावर ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करू शकतो, त्याप्रमाणे क्रिप्टो करन्सी मध्ये काम करणे शक्य नाही. कोणत्या क्षणामध्ये क्रिप्टो करन्सी मध्ये एखादा बिटकॉइन सारखा विशेष कॉइन उच्चांक गाठेल किंवा निश्चयांक गाठेल हे सांगता येण कठीण आहे.

बिटकॉइन चा शोध कोणी लावला | Who Discoverd Bitcoin

2009 मध्ये खऱ्या अर्थाने बिटकॉइन हा मार्केटमध्ये आला, मात्र अजूनही बिटकॉइनचा शोध कोणी लावला किंवा या पाठीमागे कोणाचा चेहरा आहे हे आतापर्यंत लक्षात आलेलं नाही. फक्त एका प्रोग्रामर ग्रुपने यावर संशोधन करून बिटकॉइन व क्रिप्टो करन्सी हे मार्केटमध्ये आणले व त्या प्रोग्रामर ग्रुपच्या मुख्य व्यक्तीचे टोपण नाव सातोशी नाकामोटो असे जाहीर केलेले आहे. एका आकडेवारीनुसार असही जाहीर झालेल आहे की बरेच शेअर मार्केट मधील तज्ञ बिटकॉइनला आधारभूत करन्सी मानत नाहीत

मी बिटकॉइनची खरेदी करून किती पैसे कमवू शकतो | How Much Money I Can Earn From Bitcoin

बिटकॉइनची खरेदी केल्यावर तुम्ही किती पैसे कमावू शकता हे सर्व तुमच्या बिटकॉइन संदर्भात असलेल्या ज्ञानावरती अवलंबुन आहे. बिटकॉइन ही करन्सी कधीच स्थिर राहत नाही नेहमी या करन्सी मध्ये व त्याच्या किमतीमध्ये क्षणाक्षणाला बदल होत असतो. कोणत्या वेळेला बिटकॉइनची खरेदी करावी व कोणत्या वेळी बिटकॉइन विक्री करावे ही स्ट्रॅटेजी एकदा लक्षात आली तर तुम्ही चांगल्या प्रकारे बिटकॉइन द्वारे नफा कमउ शकता.

बिटकॉइन खरेदी करताना तुम्ही किती पैशाचे बिटकॉइन खरेदी करतात यावरती तुम्हाला त्यामध्ये किती नफा होईल हा एक प्राथमिक अंदाज निघू शकतो. हळूहळू तुम्हाला बिटकॉइनमध्ये जसं जसं अनुभव येईल त्या प्रकारे तुमचा नफा बिटकॉइनमध्ये वाढू शकतो व तुम्ही एक चांगली मोठी रक्कम बिटकॉइनच्या माध्यमातून कमावू शकता.

हे सुद्धा वाचा : डिजिटल सोने कसे खरेदी करावे, डिजिटल सोने खरेदी करण्याचे प्रकार

सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम बिटकॉइन प्लॅटफॉर्म कोणते आहे | Wich Is The Best Bitcoin Platforms

बिनान्स (Binance)

जगभरातील जास्तीत जास्त बिटकॉइन खरेदी विक्री करणारे ग्राहक हे या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. जेव्हा बिटकॉइन हा नवीनच मार्केटमध्ये आला होता तेव्हापासून बिनान्स हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त वापरकर्त्यांचा विश्वास हा बिनान्स या प्लॅटफॉर्मवर आहे.

बिनान्स या प्लॅटफॉर्म मध्ये बिटकॉइन सोबतच इतर वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सी साठी सुद्धा एक जागा निर्माण केलेली आहे. मात्र या सर्व करन्सी मध्ये बिटकॉइन हीच करन्सी सर्वात प्रसिद्ध आहे.

वझिरएक्स (Wazirx)

वझिरएक्स हासुद्धा एक नामांकित क्रिप्टो प्लॅटफ्रॉम आहे. खास करून भारतामध्ये या प्लॅटफॉर्मवरचे वापर करते जास्त आहेत, नवनवीन नवके व्यक्ती सुरुवातीला बिटकॉइन खरेदी करताना याच प्लॅटफॉर्मचा वापर करत असतात. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बिटकॉइन खरेदी करू शकता तसेच बिटकॉइन विक्री सुद्धा करू शकता व यासोबतच इतर कॉइन मध्ये सुद्धा पैसे गुंतवू शकता.

वझिरएक्स या प्लॅटफॉर्म चे फीस सुद्धा इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेमध्ये कमी आहे. हा प्लॅटफॉर्म अजून बिटकॉइन मार्केटमध्ये नवीनच आहे त्यामुळे जास्तीत जास्त वापर करते या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित होत असतात.

हे सुद्धा वाचा :  गुंतवणूक करण्याआधी काय खबरदारी घ्यावी ? जाणून घ्या हि आवश्यक माहिती

कॉइन डि सी एक्स (Coin DCX)

कॉइन डी सी एक्स हा प्लॅटफॉर्म क्रिप्टो मार्केटमध्ये अजून नवीनच आहे, मात्र तरीसुद्धा खूप कमी कालावधीमध्ये या प्लॅटफॉर्मनी त्यांची वापरकर्त्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवलेली आहे, व या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही रेफर करून सुद्धा बिटकॉइन कमवू शकता.

हा प्लॅटफॉर्म तुम्हाला रेफर करून पैसे कमविण्याची संधी उपलब्ध करून देतो याच कारणामुळे बरेच वापर करते या प्लॅटफॉर्म वरती आवर्जून येत आहेत, तसेच या प्लॅटफॉर्मवर इतर प्लॅटफॉर्म पेक्षा सोप्या पद्धतीने गुंतवणूक कशी करावी याचा आराखडा दिलेला आहे.

कॉइन स्विच कुबेर (Coin Switch Kuber)

कॉइन स्विच कुबेर हा आत्ता प्रचलित झालेला बिटकॉइन करन्सीचा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला रेफर करून पैसे कमविण्याची संधी मिळते जेव्हा तुम्ही कॉईन स्विच कुबेर या ॲपच्या माध्यमातून तुमच्या मित्रांना किंवा इतरांना रेफर करत असतात तेव्हा तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरती

कॉइन स्विच कुबेर कडून पन्नास रुपयांचे बिटकॉइन मिळतात. ज्यांना काहीही इन्व्हेस्टमेंट न करता जर बिटकॉइनच्या माध्यमातून चांगला पैसा कमवायचा असेल तर ते या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त रेफर अँड अर्न या प्रोग्राम मध्ये सहभागी होऊन चांगले पैसे बिटकॉइनच्या माध्यमातून कमउ शकता.

बिटकॉइन मायनिंगच्या माध्यमातून मी किती कमाई करू शकतो | How Much Money I Can Earn From Bitcoin Mining

बिटकॉइन मायनिंगच्या माध्यमातून तुम्ही अनलिमिटेड पैसे कमवू शकता मात्र हे सर्व तुम्हाला बिटकॉइन माइनिंग चा किती अनुभव आहे व त्यामध्ये तुमची स्किल कशी आहे यावरती हे सर्व ठरत. बिटकॉइन मायनिंग चे प्रमाण सातत्याने वाढतच आहे.

बरेच बिटकॉइन वापर करते हे बिटकॉइनमध्ये सरळ गुंतवणूक न करता बिटकॉइनमध्ये मायनिंग करत असतात व बिटकॉइनमध्ये मायनिंग करून ते चांगल्या प्रकारे पैसे कमवतात. सातत्याने बिटकॉइनमध्ये मायनिंग करत राहिल्यामुळे चांगल्या प्रकारचा अनुभव मिळतो व त्या अनुभवाच्या जोरावर संपत्ती वाढवण्यामध्ये आणखीनच मदत होउ शकते.

मी भारतामध्ये बिटकॉइन खरेदी करू शकतो का | Can I Buy Bitcoin In India

अगोदर भारत सरकारने बिटकॉइन वरती कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादलेले नव्हते मात्र या एक-दोन वर्षांमध्ये भारत सरकारने बिटकॉइन खरेदी करण्यामध्ये व तसेच बेटकॉइन खरेदी करण्याचे जे प्लॅटफॉर्म आहे त्या संदर्भात एक गाईडलाईन जाहीर केलेली आहे, जर तुम्ही त्या गाईडलाईन प्रमाणेच क्रिप्टो मध्ये बिटकॉइनचे व्यवहार केले तर तुम्हाला कशाचाही धोका संभवू शकत नाही.

भारतामध्ये बिटकॉइन खरेदी करण्याचे प्रमाण हे लक्षणीयरीत्या वाढतच आहे. भारतातील बरेचसे उद्योगपती हे बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये स्वारस्य दाखवतात, सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमुळे आता बिटकॉइन खरेदी करणे आणखीनच सोपे झालेले आहे.

बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण खरंच योग्य आहे का | Invest In Bitcoin Right Or Not

बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करून तातडीनेच नफा मिळाला पाहिजे अशा माईंड फिटने बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करणे जोखीमदारीचे ठरू शकते, लॉन्ग टर्म च्या कालावधीचा विचार करून जर बिटकॉइन मध्ये गुंतवणूक केली तर शाश्वती मिळते की बिटकॉइनच्या माध्यमातून तुम्हाला अगोदरचा आलेख बघता चांगला नफा मिळू शकतो.

बिटकोई मध्ये गुंतवणूक करणे अगोदर स्वतःला बिटकॉइन विषयी किती ज्ञान आहे आपण त्यासंदर्भामध्ये किती सुज्ञान आहोत हे सुद्धा अगोदर जाणून घ्यायला हव व त्यानंतरच बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करणे सोयीस्कर ठरू शकते.

बिटकॉइन वापरणे सोपे आहे का | Use Of Bitcoin Simple Or Not

बिटकॉइन वापरणे सुरुवातीला तुम्हाला जोखीमदारीच वाटू शकत, मात्र तुम्ही जेव्हा बिटकॉइनच्या मूळ संकल्पना व बिटकॉइन यांच्या संदर्भात निरीक्षण करून चांगली माहिती संकलित करता तेव्हा तुम्हाला बिटकॉइन वापरणं सहजच शक्य होऊन जातं.

ज्या प्रकारे तुम्ही बिटकॉइनचा वापर वाढवत जातात तसा तसा बिटकॉइन बाळगण्याचा अनुभव तुमचा वाढत जातो व त्या आधारावर बिटकॉइन वापरणे सोपे होऊन जाते.

बिटकॉइन खरेदी करण्यासाठी वयाची मर्यादा काय आहे | Age Criteria For Buy Bitcoin

बिटकॉइन खरेदी करण्यासाठी 18 वर्षाच्या पुढे वय असणे बंधनकारक आहे. ज्याप्रमाणे बँकेमध्ये अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा ठरवलेली असते अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्लॅटफॉर्म मध्ये बिटकॉइन खरेदी करायचा असेल तर त्या प्लॅटफॉर्मने अधोरेखित केलेली वयोमर्यादा तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल.

साधारणपणे सर्वच बिटकॉइनच्या प्लॅटफॉर्म मध्ये वयोमर्यादा ही अठरा वर्ष पूर्ण असावी असं सांगितलेलं आहे, त्याखालील वयोमर्यादा असलेले वापर करते हे बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्र राहतीलच याची शाश्वती नाही.

Leave a comment