Bajaj EMI Card काय आहे ? Bajaj EMI Card ची संपूर्ण माहिती, उपयोग, किंमत, मर्यादा, कार्ड प्रोसेस

बजाज फिनसर्व्ह इस्टा इएमआय कार्डच्या आधारावर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ई एम आय वर नवनवीन बाजारातील उत्पादन विकत घेऊ शकतात व महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे उत्पादन वस्तू या कार्डच्या माध्यमातून विकत घेत असतात त्याचा संपूर्ण एकंदरीत भार हा तुमच्यावर येत नाही. बजाज फिनसर्व्ह कार्ड तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या स्वतःवर घेते. तुम्ही बजाज फिनसर्व्ह कार्ड मधून मासिक हप्त्यांच्या आधारे पैसे भरू शकता तसेच साधारणपणे बघितल्यास आपण जर बाजारामधून काही वस्तू किंवा सेवा खरेदी केल्या तर आपल्याला त्या वस्तूंची किंमत सेवेच मूल्य रोखपणे विक्रेत्याच्या हातात द्यावे लागते, मात्र इथे तुम्ही घेतलेल्या वस्तूची संपूर्ण किंमत एकदाच न देता हप्त्यांच्या आधारावर टप्प्याटप्प्याने देऊ शकता. बऱ्याच वेळा तुम्हाला तुमची आवडती वस्तू घ्यायची असेल व तुमच्याकडे ती वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेस बजेट नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या बजाज फिनसर्व्ह कार्डच्या आधारावर तुमच्या आवडत्या वस्तूला विकत घेऊ शकता व पुढे मासिक हप्त्याच्या नियमावलीप्रमाणे सुलभ रीत्या पैसे भरू शकतात.

बजाज ईएमआय कार्ड ची किंमत काय आहे | what Is The Value Of Bajaj Finserve EMI Card

बजाज फिनसर्व्ह इस्टा ई एम आय कार्ड हे तुम्हाला जवळपास ₹2 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट ची मर्यादा देते. ही मर्यादा तुम्हाला क्रेडिट संपून जाण्याची चिंता करू देत नाही, तुम्ही या दरम्यान मनसोक्त खरेदी करू शकता जेणेकरून तुम्हाला आवडीच्या वस्तू खरेदी करण्यास मदत होईल.

झिरो डाउन पेमेंट आणि नो कॉस्ट ईएमआय (Zero Down Payment And NO Cost EMI) : या कार्डचे वापरकर्त्यासाठी बरेच फायदे आहेत, या कार्डचा मुख्य फायदा बघितल्यास काही मोजक्या व निवडक उत्पादनांसाठी तुम्ही कोणतेही व्याज न भरता अगदी शून्य व्याजाच्या अंतर्गत संपूर्ण वस्तू व सेवा खर्च ई एम आय च्या आधारावर बजाज ईएमआय कार्ड वापरून भरू शकता.

मी बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क कार्ड मधून पैसे काढू शकतो का | Can I Widraw Money From Bajaj Finserve EMI Card

याचे उत्तर नाही असं आहे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बजाज फिनसर्व्ह ईएमआय नेटवर्क कार्डचा वापर रूप पैसे काढण्यासाठी करू शकत नाही, हे बजाज एम आय नेटवर्क कार्डच्या अंतर्गत होऊ शकत नाही. या कार्डमध्ये प्रामुख्याने तुम्हाला ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने ज्या विक्रेत्याच्या स्टोअर मध्ये बजाज फिनसर्व्ह ई एम आय नेटवर्क कार्डची भागेदारी असेल तिथून तुम्ही तुमच्या निवडक आवडीच्या वस्तू या बजाज ई एम आय कार्डचा वापर करून सुलभ हप्त्यांच्या आधारे घेऊ शकतात.

यादरम्यान तुम्हाला तिथे बऱ्याच ऑफर सुद्धा मिळू शकतात व त्याचा वापर तुम्ही आणखी खरेदीसाठी किंवा पैसे बचतीसाठी करू शकता. बरेच व्यक्ती बजाज फिनसर्व्ह ई एम आय नेटवर्क कार्डचा वापर यासाठी सुद्धा करून घेतात. बाजारभावाप्रमाणे अगोदर वस्तूंची छाननी करून घेतात की कोणती वस्तू किती आकर्षक ऑफर मध्ये मिळत आहे व त्यानंतर बजाज ईएमआय कार्ड च्या माध्यमातून ती वस्तू घेण्याचा व त्याच्यावर आकर्षक सूट मिळविण्याचा त्यांचा कायास असतो.

बजाज ईएमआय नेटवर्क कार्डचा वापर काय आहे | Bajaj Finserve EMI Card Uses

बजाज ईएमआय नेटवर्क कार्ड हे एक प्रगतशील ऑनलाइन पद्धतीने पेमेंट इन्स्ट्रुमेंट करण्याचे स्थान आहे, ज्याच्या आधारावर तुम्ही तुम्हाला सोयीस्कर तशी नवनवीन उपकरण वस्तू सेवा खरेदी करू शकता. जसे की एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर , मायक्रोवेव्ह ओव्हन , डिजिटल टीव्ही, वॉटर प्युरिफायर यासारख्या असंख्य वस्तू तुम्ही बजाज ई एम आय नेटवर्क कार्डचा वापर करून विकत घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही वस्तूचे रोख पैसे परिपूर्णरित्या एकाच वेळी भरण्याची गरज नाही , तुम्हाला बजाज ईएमआय नेटवर्क कार्डच्या अंतर्गत सुलभ हप्त्यांनी घेतलेल्या वस्तूचा मोबदला देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेथे तुम्ही टप्प्याटप्प्याने किंमत चुकवू शकता व एकाच वेळी मोठा आर्थिक भार न घेता तुमची वस्तू खरेदी करण्याची इच्छा या प्रकारे पूर्ण होते.

बजाज फिनसर्व्ह ई एम आय कार्ड साठी काय मर्यादा आहे | Limitations Of Bajaj Finserve EMI Card

बजाज फिनसर्व्ह इस्टा इ एम आय कार्ड हे तुम्हाला ₹2 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट ची मर्यादा मंजूर करून देत. यामध्ये तुम्ही दोन लाख रुपयांपर्यंत कुठलीही तुमची आवडती वस्तू किंवा सेवा घेऊ शकता. ही क्रेडिट ची रक्कम सुद्धा सहजरित्या मिळत नाही यासाठी तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर व तुमचे उत्पन्न या सर्व घटकांचा विचार करून त्यानंतरच तुम्हाला बजाज फिनसर्व्ह ई एम आय कार्ड काय काय सेवा देऊ शकते याचा विचार केला जातो. म्हणून सर्वप्रथम तुमच्या बँकेचा CIBIL स्कोअर बजाज ई एम आय कार्डच्या आखून दिलेल्या निकषांत आलेला पाहिजे.

बजाज ई एम आय कार्ड चा वापर करून सोने खरेदी करता येते का | Can I Buy Gold Through The Bajaj Finserve EMI Card

RBI आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जर बघितले तर तुमचे बजाज फिनसर्व्ह ई एम आय नेटवर्क कार्ड वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारे सोनं खरेदी करू शकत नाही. खऱ्या अर्थाने तर तुम्ही वास्तविकतेमध्ये EMI च्या आधारावर सोने खरेदी करू शकत नाही किंवा सोन्याचा भाव वाढ या पद्धतीने होऊ शकत नाही. अगदी जर तुमच्या क्रेडिट कार्डवर सोने खरेदीचे व्यवहार असतील तर ते व्यवहार सुद्धा तुम्ही EMI च्या आधारावर रूपांतरीत करू शकत नाही.

बजाज ईएमआय कार्ड मिळवण्यासाठी किती वेळ लागतो | How Much TimeTake To Get Bajaj Finserve EMI Card

तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे बजाज ईएमआय कार्ड साठी अर्ज करू शकता.

Online : ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी तुम्हाला केवळ लॉग इन करून 399 रुपये भरावे लागेल, व काही आठवड्यामध्येच तुम्हाला कंपनीकडून ऑफिशियल रित्या EMI कार्ड पाठवले जाईल. मात्र ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही फक्त जे विद्यमान ग्राहक आहेत त्यांच्यासाठीच राखीव करून ठेवलेली आहे. ज्यांच्या (बजाज फिनसर्व्ह मुदत ठेवी ,कर्ज यासारख्या ठेवी आहेत)

Offline: ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत सुद्धा सोपी आहे. तुम्ही नेट कॅफेवर जाऊन किंवा सविस्तर माहिती मिळवून त्या आधारावर ऑफलाइन प्रकारे अर्ज करू शकता , त्या आधारावर तुमच्या माहितीची छाननी झाल्यावर ती आठवडाभरामध्ये तुम्हाला तुमचे EMI कार्ड मिळून जाईल.

माझं बजाज कार्ड सक्रिय आहे किंवा नाही हे मी कसं तपासून शकतो | How To Check Bajaj Finserve EMI Card Is Active Or Not

बजाज ईएमआय कार्ड साठी तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर नोंदणी केलेला आहे, त्या मोबाईल नंबरच्या आधारावर सर्वप्रथम तुम्हाला साईन-इन करावं लागेल पुढे तिथे नंबर टाकून तुम्हाला एक ओटीपी (OTP) मिळेल तो ओटीपी टाकून पुढची प्रक्रिया व्हायला सुरुवात होईल. तिथे त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकावी लागेल त्यापुढे माय रिलेशन हा विभाग निवडून तुमचं कार्ड निवडावं लागेल. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या कार्डची वैधता स्थिती आणि एकूण उपलब्ध मर्यादा किती आहे यासारखे सर्व पर्याय बघून तुमच्या लक्षात येईल की तुमचं बजाज कार्ड सक्रिय आहे किंवा नाही.

बजाज ईएमआय कार्ड वरून बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केल्या जाऊ शकतात का | Can I Widraw Money Through Bajaj Finserve EMI Card In Bank Account

तुमच्या बजाज ईएमआय नेटवर्क कार्डचा वापर करून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करून घेणे अशक्य प्राय आहे. ईएमआय कार्ड चा वापर सामान्यपणे क्रेडिट वर खरेदी करण्यासाठी केल्या जातो. क्रेडिट कार्डचा वापर हा तुमच्या बँकेच्या वैयक्तिक कार्ड प्रमाणे तुम्ही करू शकत नाही. बजाज ईएमआय कार्ड ज्या निकषांच्या आधारावर काम करते त्या निकषांच्या आधारावरच तुम्ही त्या कार्डचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याच्या अंतर्गत उपभोग घेऊ शकता.

Leave a comment