चित्रपट आणि सर्वसामान्य मनुष्य यांची नाळ हमखास जोडलेली असते. चित्रपटाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी नव्याने शिकत असतो. चित्रपट मनुष्याला साक्षर बनवतो. चित्रपटाच्या द्वारे आपण एखादे कथानक मांडत असतो. हे कथानक सर्वसामान्य व्यक्ती आपलेसे करत असतो. एखाद्या चित्रपटाची कथा जितकी महत्त्वाची असते, तितकेच पात्र साकारणारे अभिनेता व अभिनेत्री देखील महत्त्वाचे मानले जातात. या चित्रपटाच्या कथांमध्ये एक पात्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते ते म्हणजे अभिनेता किंवा अभिनेत्रीची आई. आई शिवाय चित्रपटाची कथा अपूर्ण मानली जाते. आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री या मुख्य भूमिका साकारणाऱ्या हिरो पेक्षा वयाने लहान आहेत याबद्दल अनेकांना माहिती नसते हीच माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जवान चित्रपटात रिध्दी डोगराने साकारलेली आईची भूमिका चाहत्यांनी घेतली डोक्यावर
नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाचे नाव आहे जवान. शाहरुख खान ने या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ देखील घालताना दिसून येत आहे. या चित्रपटाने कमी कालावधीमध्ये बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई देखील केलेली आहे म्हणूनच या चित्रपटांमध्ये शाहरुख खानचे जितके कौतुक केले जात आहेत त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये अन्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता व अभिनेत्री यांची देखील चर्चा केली जात आहे.
रिद्धी डोगरा
परंतु आज आम्ही तुम्हाला शाहरुख खान बद्दल न सांगता जवान या चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या आईची भूमिका करणारी रिद्धी डोगरा या व्यक्ती रेखा साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत. जवान या चित्रपटामुळे या अभिनेत्रीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या शिबा चड्डा या शाहरुख खान पेक्षा वयाने लहान आहेत. असे असून देखील या चित्रपटांमध्ये आईची साकारलेली भूमिका चित्रपटाला एक वेगळीच वळण देत आहे, म्हणूनच शिबा यांनी साकारलेली आईची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. तसे पाहायला गेले तर शिबा शाहरुख खान पेक्षा सात वर्ष लहान आहे.
नर्गिस
तुम्हा सर्वांना अभिनेत्री नर्गिस माहितीच असेल. नर्गिसने मदर इंडिया चित्रपटांमध्ये अभिनेता सुनील दत्त यांच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील आई व मुलाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद देखील दिलेली. या चित्रपटाने खूप सारे अवॉर्ड्स देखील मिळवले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा या चित्रपटांमध्ये अभिनेत्री नर्गिस सुनील दत्त यांच्या आईची भूमिका साकारण्यात मग्न होती तर दुसरीकडे अभिनेत्री नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या प्रेमाची कथा देखील ऑफ सेटवर घडत होती म्हणूनच या दोघांचे नाते आणि चित्रपट सर्वांच्या लक्षात आहे.
शेफाली शहा
अभिनेत्री शेफाली शहा यांनी देखील आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारलेली आहे. चित्रपट वक्त मध्ये अमिताभ बच्चन यांची पत्नी तर अभिनेता अक्षय कुमार ची आई म्हणून अभिनेत्री शेफाली यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अक्षय कुमार हे अभिनेत्री शेफाली यांच्यापेक्षा वयाने पाच वर्ष मोठे आहेत, असे असून देखील या दोघांमधील अंतर मात्र अजिबात दिसून आले नाही.
रीमा लागू
बॉलीवूड चित्रपटातील सर्वात आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रीमा लागू. रीमा लागू यांना लहान मुलगा ते ज्येष्ठ नागरिक सर्वजणच ओळखतात. रीमा आज आपल्यात नसल्या तरी रीमा यांनी चित्रपटांमध्ये साकारलेली आईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिनेत्री रीमा यांनी बॉलीवूड इंडस्ट्री मधील अनेक अभिनेत्रींची व अभिनेत्यांची आई म्हणून भूमिका साकारलेली आहेत. ज्या ज्या चित्रपटांमध्ये रिमा यांनी आईची भूमिका साकारली होती ते सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट गाजले होते. संजय दत्त, सलमान खान, माधुरी दीक्षित अशा अनेक सुपरहिट अभिनेता व अभिनेत्री सोबत रिमा यांनी काम केले होते. संजय दत्त आणि रीमा लागू यांचे वय एक सारखे होते. या दोघांमध्ये कोणतेही अंतर नसल्याने दोघांचे एकमेकांसोबत चांगले जमायचे परंतु चित्रपटांमध्ये रिमा यांनी साकारलेली भूमिका आजही कौतुकास्पद मानली जाते. आयुष्यभर रीमा यांनी आई ही भूमिका तितकीच ताकदीने साकारली. त्यांच्यानंतर खूप कमी अभिनेत्रींना सगळ्या स्टार्स यांच्या आई बनण्याचे भाग्य लाभले असे म्हणायला हरकत नाही.