प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचा थक्क करणारा जीवन प्रवास | Dev Anand Journey Info in Marathi

देव आनंद यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जवळपास सहा दशकांपर्यंत पकड मजबूत ठेवली. त्यांचा पूर्ण नाव आहे धर्मदेव पिशोरीमल आनंद त्यांचा जन्म पंजाब राज्यामधील गुरुदासपूर जिल्ह्यातील शंकरगढ या गावी 26 सप्टेंबर 1923 ला झाला. देव आनंद यांचे वडील म्हणजेच पिशोरीमल आनंद हे पेशाने वकील होते व सर्व दूर त्यांची चांगलीच ख्याती होती तर त्यांची आई उत्तम गृहिणी होत्या.

देवानंद यांचे शालेय शिक्षण हे सॅक्रेड हार्ड स्कूलमध्ये झालं. पुढचं शिक्षण त्यांनी लाहोर गव्हर्नमेंट कॉलेज मधून केले. लाहोरच्या गव्हर्मेंट कॉलेजमधून इंग्लिश साहित्यात त्यांनी B.A ही कला शाखेची पदवी मिळवली. देवानंद यांना हिंदी उर्दू इंग्लिश या तिन्ही भाषा खूप तरबेज पणे येत असत, या भाषेमध्ये त्यांचा खास रस होता. लाहोर मधील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर देव आनंद यांनी सरळ मुंबई गाठली व मुंबईमध्ये मिलिटरी सेन्सर ऑफिस मध्ये लिपिकाची नोकरी पत्करली.

देव आनंद यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण | Dev Anand Entry In Hindi Film Industry

देवानंद यांचे हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये 1946 ला हम एक है या चित्रपटांमधून पदार्पण केले, त्यांचा हा पहिलाच सिनेमा होता मात्र या चित्रपटाने त्यांची घोर निराशा केली. त्यानंतर देवानंद यांना जिद्दी हा सिनेमा मिळाला या सिनेमानेच पुढे देव आनंद यांची चित्रपटसृष्टीला व असंख्य त्यांच्या चाहत्यांना त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.

जिद्दी हा त्यांचा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिस वर यशस्वी ठरला या कारणामुळेच त्यांच्याकडे चित्रपटांचा खच वाढला. पुढे त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर, बाजी, सीआयडी, कालापानी, कालाबाजार ,हम दोनो, जाल असे विविध चित्रपट गाजवले. प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांची अभिनयाची एक वेगळी छाप पडत असे.

देव आनंद यांच्या सर्व सुरुवातीच्या चित्रपटांचं दिग्दर्शन हे त्यावेळचे प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी केलेलं आहे, मात्र पुढे चेतन आनंद या त्यांच्या भावाला सोबत घेऊन देव आनंद यांनी नवकेतन बॅनरची स्थापना केली. याच बॅनरखाली नंतर देव आनंद यांनी बऱ्याच नामांकित चित्रपटांची निर्मिती केली त्यातील काही चित्रपट हे खूप सुपर डुपर हिट ठरले . त्यातीलच गाईड, जॉनी मेरा नाम है ज्वेल थीफ, हे काही चित्रपट विशेष ध्यानात राहण्यासारखे आहेत.

देव आनंद निर्माता दिग्दर्शक लेखक म्हणून केलेलं काम | Dev Anand Director Producer Writer

काही कालावधीमध्ये त्यांनी असंख्य जनसमुदायाला आपलंसं करून घेतलं होतं. जेव्हा त्यांचे चित्रपट सिनेमागृहामध्ये लागत, तेव्हा एकच तुंबाड गर्दी चित्रपट ग्रहांमध्ये होत असे. बऱ्याच वेळा चित्रपटाचे शो बघण्यासाठी त्यांच्या काही चाहत्यांना वेटिंग पीरियड वर थांबावं लागत. त्यांच्या अभिनयाचा ठसा सर्व दूर पसरला होता.

त्यांनी त्यांच्या निर्माता दिग्दर्शक व लेखक या करिअरला सुद्धा त्याच काळामध्ये सुरुवात केली. त्यांच्या निर्मिती खाली त्यांनी अस्सल चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला, खास करून त्यांच्या निर्मितीतील हम नवजवान ,आनंद और आनंद ,हरे राम हरे कृष्णा, स्वामी दादा या चित्रपटांनी त्यांना उत्तम दिग्दर्शक तसेच निर्मितीकाराची पदवी बहाल केली.

देव आनंद यांचे वैवाहिक आयुष्य | Dev Anand Marriage Life,Love Life

देव आनंद यांचं वैवाहिक आयुष्य खूपच रंजक आहे.1954 मध्ये अभिनेत्री कल्पना कार्तिक हिच्यासोबत देव आनंद यांनी लग्न केलं होतं. जरी त्यांनी कल्पना कार्तिक यांच्यासोबत वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली तरी त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच व्यक्तींच आगमनही झालं होतं. काही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत लग्न करण्याची ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांनी स्थिर संबंध न ठेवता मनाला पटेल त्याप्रमाणे लग्नाचे निर्णय घेतले होते.

प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांचा थक्क करणारा जीवन प्रवास | Dev Anand Birthday In Marathi

असं सांगितलं जातं की देव आनंद यांचं सुरैया वर खूप प्रेम होतं, मात्र दुर्दैवाने पुढे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही व ही प्रेम कहानी मध्येच थांबली. ती एक गायिका व सोबतच अष्टपैलू अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीमध्ये त्याकाळी ओळखल्या जात असे. तिच्या गायनाने व अभिनयाने सर्वच मंत्रमुग्ध होऊन जात असत. देव आनंद यांचं मन तिच्यावर जडलं होतं मात्र पुढे या प्रेमाला काही कालावधीतच पूर्णविराम मिळाला. पुढे त्यांचं लग्न का झालं नाही हे आतापर्यंत ही समजू शकलेलं नाही.

मात्र बऱ्याच वृत्तवाहिन्यांमधून असं समजतं की देव आनंद आणि सुरैया यांच्या प्रेमाला विरोध सुरैयाच्या आजीने केला होता. देव आनंद यांची खूप इच्छा होती तिच्या सोबत लग्न करण्याची मात्र तिच्या आजीमुळे हे शक्य होऊ शकलं नाही. जेव्हा देव आनंद व सुरैया हे एखाद्या चित्रपटाची शूटिंग करत असत तेव्हा तिची आजी सेटवर येऊन डायरेक्टरला चेतावणी देत असतात की या दोघांना एकमेकां जवळ येऊ देऊ नको म्हणून. त्यादरम्यान डायरेक्टर आजी सोबत थोडं गोडीने बोलून त्यांना बाजूला नेत असत व त्यानंतर दोघांच्या सहमतीने शूटिंग करत असत.

देव आनंद यांची तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ | Dev Anand Most Famous In Young Girls

त्याकाळचे एव्हरग्रीन सुपरस्टार देव आनंद यांची एक झलक बघण्यासाठी तरुण मुली स्वतःचा जीव देखील ओवाळून टाकायला तयारच असत. मुंबईमध्ये उद्घाटन प्रसंगी किंवा काही समारंभासाठी जेव्हा देवानंद यांची एन्ट्री व्हायची तेव्हा त्यांच्या चोहोबाजूंनी तरुणींची त्यांना बघण्यासाठी एकच झुंबड उडत असे. त्या काळात आताच्या सारखे सोशल मीडिया वगैरे नव्हते तरीसुद्धा त्यांच्या फोटोनाही खूप मागणी होती. तरुणाईच्या तर देव आनंद हे गळ्यातले ताईतच बनले होते.

देव आनंद यांना मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार | Dev Anand Dadasaheb Phalke Award

देवानंद यांच्या चित्रपटसृष्टीतील बहुरंगी योगदानाबद्दल 2002 साली त्यांना चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणारा दादासाहेब फाळके हा पुरस्कार मिळाला. 2001 मध्ये भारत सरकारने देव आनंद यांना पद्मभूषण या मानाच्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं. देव आनंद त्यांच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नवनवीन चेहऱ्यांना नेहमी संधी देत असत, त्यांनी संधी दिल्यामुळेच काही अभिनेत्री टीना मुनीम ,तब्बू , झीनत अमान या अष्टपैलू अभिनेत्री नी चित्रपट सृष्टी चांगलीच गाजवली.

देव आनंद यांनी त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये मिळालेल्या यशानंतर त्यांचे बंधू चेतन आनंद व विजय आनंद यांनासुद्धा मदत करून चित्रपटसृष्टी मध्ये आणले, पुढे त्यांचे दोन्हीही बंधू हे चित्रपटसृष्टी मधील नावाजलेले दिग्दर्शक व पटकथा लेखक म्हणून नावा रूपाला आले. त्यांच्या सहा दशकांच्या अभिनयामध्ये त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एका प्रकारे राज केल आहे.

त्यांच्या कारकिर्दीत अख्खी सिनेमासृष्टी गाजवणाऱ्या या दिलदार अभिनेत्याने 30 डिसेंबर 2011 ला या जगातून शेवटचा श्वास घेतला. त्यांनी केलेला अभिनय व चित्रपट सृष्टी मध्ये राबवलेले वेगवेगळे प्रयोग हे नक्कीच त्यांची आठवण येणाऱ्या चित्रपटसृष्टीतील नवीन पिढीला एका वेगळ्या प्रकारे करून देईल यात काही शंका नाही.

Leave a comment