थेट न्यूयॉर्क मधून रणबीर – अलियाने फोटो केले शेअर, ब्लॅक वेअर हॉट स्टाईल पाहून चहाते झाले दंग !

बॉलीवूड क्षेत्रातील सेलिब्रिटी वर्ग हा नेहमी चर्चेचा विषय असतो. सेलिब्रिटी आपल्याला अनेकदा चित्रपटांमध्ये, वेगवेगळ्या पार्टीमध्ये दिसून येतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये सुट्टी घालवतानाचे फोटो सुद्धा अनेकदा पाहायला मिळतात. अनेकदा माध्यमे ही सेलिब्रिटींच्या आजूबाजूला, मागेपुढे फिरत असतात आणि म्हणूनच सेलिब्रिटी यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या सर्वांची माहिती आपल्याला घरबसल्या पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी बद्दल सांगणार आहोत. सेलिब्रिटी तुमच्या सर्वांचे लाडके आहे. या सेलिब्रिटी कपल्सच्या चर्चा बॉलीवूडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. काही महिन्यापूर्वीच ही जोडी लग्नाच्या बेडीमध्ये देखील अडकलेले आपल्याला पाहायला मिळाली. या सेलिब्रिटी कपलचे नाव आहे रणबीर आणि आलिया. या दोघांनीही आतापर्यंत चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून चाहत्या वर्गांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे.

खूप सारे चित्रपट, नवीन प्रोजेक्ट, जाहिराती केल्यानंतर कुठेतरी विरंगुळा मिळावा या अनुषंगाने सेलिब्रिटी कुठेतरी बाहेर परदेशी फिरायला जात असतात परंतु तिथे गेल्यावर देखील सेलिब्रिटी आपले फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. असेच काही फोटो रणबीर आणि आलिया या दोघांचे व्हायरल झालेले आहेत. या दोघांनी न्यूयॉर्क येथे व्हेकेशन मधील नवीन फोटो शेअर केल्याने चाहता वर्ग अगदी दंग झालेला आहे तसेच या कपलबद्दल बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चा देखील केल्या जात आहेत.

रणबीर आणि आलिया सध्या न्यूयॉर्कमध्ये आनंदाने सुट्टी व्यतीत करत आहेत. कामापासून तसेच कुटुंबीयांपासून दूर राहून स्वतःचा कॉलिटी टाईम घालवत आहेत. दोघे ही एकमेकांना छान वेळ देखील देत आहेत.

रणवीर कपूर आणि आलिया हे दोघेही स्टाईलच्या बाबतीत नेहमी अव्वल असतात. स्टाईल स्टेटमेंट म्हणून आज ही बॉलीवूड इंडस्ट्री या दोघांकडे पाहत असते. या दोघांनी घातलेले कपडे, दोघांनी केलेली स्टाईल जगामध्ये अनेक चाहते लोक फॉलो करत असतात. नुकतेच सोशल मीडियावर जे फोटो वायरल झालेले आहेत, त्या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर न्यूयॉर्कमधील रस्त्यांवर तिकडच्या स्थानिक लोकांसोबत गप्पा मारताना तसेच त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत. या दोघांनीही जे कपडे घातलेले आहेत, त्या कपड्यांमध्ये दोघेही अत्यंत सुंदर दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलिया भटच्या स्टाईल बद्दल बोलायचे झाल्यास आलियाने जीन्सवर काळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाचा जॅकेट घातलेला आहे तसेच केसांना मोकळे ठेवून चेहऱ्यावर हलकासा मेकअप देखील केलेला आहे. रणवीर कपूर ने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि काळी पॅन्ट यावर काळ्या रंगाचे लेदर जॅकेट घातलेले आहे. या दोघांची मॅचिंग जोडी पाहून सगळेजण थक्क झालेले आहेत. त्यांचे अनोखे रूप पाहून दंग झालेले आहेत.

या रोमँटिक कपलचे काळ्या कपड्यांमध्ये असलेले फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दोघांना लोकांनी खूप सारी पसंती देखील दिलेली आहे. या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास रणबिर कपूर ने सावरिया चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती त्यानंतर एकापेक्षा एक चित्रपट करून आज रणबीर कपूर आघाडीचा अभिनेता बनलेला आहे. रणबीर कपूरने साकारलेल्या अनेक भूमिका गाजलेल्या देखील आहेत तसेच रणवीर कपूर आज बॉलीवूड इंडस्ट्रीचा “चॉकलेट बॉय” म्हणून देखील ओळखला जातो.

आलिया बद्दल बोलायचे झाल्यास आलियाने स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटाच्या माध्यमातून या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अभिनयाच्या जोरावर एकापेक्षा एक चित्रपट साकारून वेगवेगळ्या भूमिका बजावून आज लोकप्रिय नायिकांमध्ये आलिया ने आपले स्थान निर्माण केलेले आहे.

आलिया आपल्याला सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह पाहायला मिळते. इंस्टाग्राम, फेसबुक वर लाईव्ह येऊन ती आपल्या चाहत्या वर्गाशी नेहमी संवाद साधत असते, याउलट रणबीर मात्र सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ॲक्टिव नसतो. तो त्याच्या कामांमध्ये व कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करत असतो.

आलिया जितक्या वेस्टर्न लुक मध्ये सुंदर दिसते त्यापेक्षा अधिक ती पारंपारिक वेशभूषांमध्ये खुलून दिसते. चित्रपटांमध्ये देखील पारंपारिक भूमिकेमध्ये आलियाने काम केले आहे तसेच गोल्डन ज्वेलरीच्या जाहिरातीमध्ये आपण सर्वांनी आलियाला पाहिले असेल. मुळातच नैसर्गिक लाभलेले सौंदर्य आणि अभिनयाची शैली या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळेच आलिया सर्वांना आवडू लागते. वेगवेगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून देखील आलिया अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असते परंतु ती तिच्या अभिनयाच्या माध्यमातून सर्व चाहत्या वर्गांवर राज्य करते असे म्हणायला हरकत नाही.

न्यूयॉर्कमध्ये आपल्या चाहत्यांसोबत काही वेळ व्यतित केल्यानंतर आलीया आणि रणबीर यांनी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पोस्टमध्ये फोटो देखील काढलेले आहेत. या फोटोंमुळे दोघेही असामान्य असून देखील सर्वसामान्यपणे जीवन जगत आहेत, याची प्रचिती अनेकांना आलेली आहे. आजच्या घडीला दोघेही सेलिब्रिटी कपल असून देखील सर्वसामान्य जनतेसोबत त्यांची नाळ जोडलेली आहे असे चित्र आपल्याला या फोटोच्या माध्यमातून दिसून येते. या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. या कपलचे कौतुक देखील मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये जितके कपल आहेत, त्या कपल पैकी रणबीर आणि आलिया ही लोकांची फेवरेट जोडी आहे. या दोघांनीही आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपट केलेले आहेत. भविष्यातही दोघांना मिळणारे प्रोजेक्ट फक्त सही करून ठेवलेले आहेत. सुट्टीवरून आल्यानंतर तेही आपल्या आगामी प्रोजेक्टवर रुजू होतील आणि आपल्याला नवीन चित्रपटांमध्ये पाहायला मिळतील. जर तुम्ही देखील आलीया आणि रणबीर यांचे नवीन काळ्या कपड्यांमध्ये फोटो पाहिले नसतील तर आत्ताच पहा.

Leave a comment