डिजिटल सोने कसे खरेदी करावे, डिजिटल सोने खरेदी करण्याचे प्रकार | How To Buy Digital Gold | Types Of Buy Digital Gold

हल्ली सोने खरेदी करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी ज्या प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे , त्याचप्रमाणे सोन्यामधील गुंतवणूक सुद्धा महत्त्वाची ठरत आहे. विशेष करून भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक न करता डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं कारणही तसेच आहे . ज्याप्रकारे तुम्ही जर भौतिक सोनं तुमच्या स्वतःजवळ बाळगून असाल किंवा कोठे घरामध्ये ठेवून असाल तर तुम्हाला याची नेहमी भीती असते की कदाचित कधीतरी याला धोका आहे यामुळे जीव सुद्धा जोखमीत टाकावा लागू शकतो.

मात्र या उलट जेव्हा तुम्ही डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करता तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नसते व गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही निश्चित राहून तुमच्या इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकता, ज्या प्लॅटफॉर्मच्या आधारावर तुम्ही डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. तोच प्लॅटफॉर्म तुम्ही गुंतवलेल्या सगळ्या पैशांची व खरेदी केलेल्या डिजिटल सोन्याची जिम्मेदारी घेण्यास पात्र असतो.

मानवासाठी सोनं इतकं महत्त्वाचं का आहे | Why Gold Is So Important For Men

सोन्याचा वापर हा गेली हजारो वर्षापासून माणूस करत आहे. सुरुवातीपासूनच सोन्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेला आहे. जेव्हा व्यक्तीला सोनं हा धातू अवगत झाला तेव्हापासून आजतागायत सोन्याचा वापर हा देवाणघेवाणीसाठी होतो. कुठल्याही देशाचं चलन किती मजबूत व अशक्त आहे हे सुद्धा त्या देशाकडे सोन्याचा साठा किती आहे किंवा चलनाच्या बरोबरीने किंवा चलनाच्या किती पटीने सोन साठवलेलं आहे यावर अवलंबून असतं. सोने कुठेही सहजासहजी मिळत नाही. सोना मिळविण्याच्या अनेक पद्धती आता शोधल्या जात आहेत. जगभरातील काही मोजक्याच ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत व तिथून सोन मिळविल्या जात. नेहमी वाढणारी सोन्याची मागणी व सोन्याचं खालवणारं प्रमाण यामुळे सोन्याचे भाव नेहमीच वधारलेले असतात हेच कारण आहे की मानवासाठी सोनं महत्त्वाचं आहे व येणाऱ्या काळामध्ये याचे महत्त्व आणखीनच वाढत आहे.

हे सुद्धा वाचा : गुंतवणूक करण्याआधी काय खबरदारी घायला हवी ?

डिजिटल गोल्ड ची खरेदी कशी करावी | How To Buy Digital Gold

डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये बरेच प्लॅटफॉर्म आहेत. काही प्लॅटफॉर्म हे प्रामुख्याने मोबाईल ॲप्स च्या स्वरूपात आहेत तर काही प्लॅटफॉर्म हे वेबसाईटच्या स्वरूपात आहेत. तुम्ही योग्य रीतीने शहानिशा करून व खात्री बाळगून त्यानंतरच त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन स्वतःचे एक अकाउंट ओपन करून पुढील डिजिटल सोन्याची गुंतवणूक निश्चित करू शकता. डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी तुम्ही जो प्लॅटफॉर्म वापरत असाल किंवा एखादे ॲप व वेबसाईट वापरत असाल तर तिथे जाऊन सर्वप्रथम गोल्ड लोकर या ऑप्शनवर जा त्यापुढे तुम्हाला डिजिटल गोल्ड ची खरेदी किती करायची या आधारावर रक्कम देऊन तुम्ही सोनं खरेदी करू शकता.

डिजिटल सोने खरेदी करणे सुरक्षित आहे का | Is Digital Gold Safe To Buy

तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्ड खरेदी करता त्या प्लॅटफॉर्मचे नियम हे वेगवेगळे असतात. सर्वप्रथम तुम्ही जेव्हा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन डिजिटल सोन्यासाठी गुंतवणूक करू इच्छितात तेव्हा संपूर्ण प्लॅटफॉर्मच्या गुंतवणुकी संदर्भात अटी व शर्ती वाचून घ्या,यामुळे तुम्हाला पुढील निर्णय घेण्यास सोपे जाईल. प्रत्येक डिजिटल गोल्ड चा प्लॅटफॉर्म हा डिजिटल सोने हे विमा उतरवलेल्या रकान्यामध्ये सुरक्षितपणे साठवून ठेवत असतो, सोबतच तुम्हाला तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेचा कुठलाही भाग बाजारभावानुसार विकण्याची मुभा नेहमीच असते.

डिजिटल गोल्ड खरेदी करणे लोकप्रिय का होत आहे | Why Is So Popular To Buy Digital Gold

डिजिटल गोल्ड खरेदी खूप अल्पवधीतच लोकप्रिय पद्धत झाली आहे, यामध्ये विशेष करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी अधिक प्रमाणामध्ये गुंतवणूक करून चांगली रिटर्न मिळवू शकता. अगदी काही डिजिटल गोल्ड च्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही फक्त ₹10 रुपयांपासून सुद्धा डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. याच काही कारणांमुळे गुंतवणुकीला सुरू करू पाहणारे नवीन गुंतवणूकदार हे डिजिटल गोल्ड च्या खरेदीला महत्त्व देतात व या व्यवहाराकडे ते एका प्रकारे आकर्षिले जातात. तसेच डिजिटल गोल्ड मध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असल्याची शक्यता नाही, प्रमाणानुसार डिजिटल गोल्ड हे 24K या पातळीमध्ये असते.

कोणती बँक डिजिटल सोने विकते | Which Bank Sell Digital Gold

सर्वच बँकांना डिजिटल सोने विकण्याचा अधिकार नाही, डिजिटल सोने विकण्याच्या अधिकारासाठी सुद्धा काही प्रक्रिया आहेत. त्याच प्रक्रियांना व्यवस्थित पार करून वेगवेगळे ॲप्स वेबसाईट व प्लॅटफॉर्म तसेच बँका या डिजिटल सोने विकण्याचा पर्याय त्यांच्या अंतर्गत उपलब्ध करून देतात. यामध्ये प्रामुख्याने ॲक्सिस बँकेसारख्या काही बँका आहेत ज्या डिजिटल सोने खरेदी विक्रीसाठी ओळखल्या जातात. डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्षाच्या पुढे असायला हवं तरच तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी बँकेमध्ये किंवा कुठल्या प्लॅटफॉर्म वरती पात्र होतात.

डिजिटल सोने खरेदी विक्रीच्या किमतीमध्ये फरक काय | What Is The Difference Between In Digital Gold Buy & Sell

डिजिटल सोने खरेदी विक्रीच्या किमतीमध्ये मुख्य फरक हा आहे , की सोन्याचे भाव हे कधीच स्थिर नसतात. दर दिवशी किंवा बाजारभावाच्या ट्रेंड नुसार सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात. सोने या धातूला इतर कोणत्याही व्यापारासारखंच वस्तू प्रमाणे खरेदी विक्री करणे सुलभ आहे. खास करून जेव्हापासून सोने डिजिटल झाले आहे तेव्हापासून ही प्रक्रिया तर आणखीनच सोपी झाली आहे.

डिजिटल सोने खरेदी विक्रीमध्ये 3% GST व अतिरिक्त हाताळणीचा प्रक्रिया खर्च लागतो. डिजिटल सोन्याच्या किमतीचा समतोल राहीलच असे नाही, कधी नफा तर कधी तोटा या दोन्ही प्रमाणामध्ये गुंतवणूकदारांना टिकून राहावं लागतं, सोन्याचा पुरवठा बाहेरील बाजाराची परिस्थिती व इतर सर्व मार्केटचा प्रभाव सोन्याच्या खरेदी विक्रीवर पडतो.

डिजिटल गोल्ड ETF म्हणजे काय | What Is Mean By Gold ETF

गुंतवणूकदार हे गोल्ड ETF साठी म्युच्युअल फंडाच्या आधारे किंवा SGB च्या अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी RBI च्या SGB मालिकेमधून स्टॉक एक्सचेंज मार्फत अगदी थेट सोन्याच्या उत्पादनामध्ये गुंतवणूक करू शकतात. डिजिटल सोन्यामधील गुंतवणूक जेव्हा तुमची मॅच्युरिटी असेल तेव्हा तुम्ही स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्येच विकून टाकू शकता. मात्र हे सर्व करण्यासाठी तुम्हाला स्टॉक मार्केटचे बेसिक ज्ञान असणे किमान आवश्यक आहे. किंवा आर्थिक सल्लागारांकडून तुम्ही योग्य गोल्ड [Gold ETF] सुचित करून घेऊ शकता.

सोने हे आर्थिक उत्पादन आहे का | Is Gold Economical Production

जगभरामधील सर्व मौल्यवान धातूंपैकी गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध असलेला धातू म्हणजे सोने. प्रत्येक व्यक्ती हमखास सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छित असतो. त्यामुळेच गुंतवणुकीसाठी सोने फार लोकप्रिय आहे. सामान्यपणे गुंतवणूकदार गुंतवणुकीची जोखीम कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सोने खरेदी करत असतात. ज्याप्रकारे एकाच वस्तूमध्ये गुंतवणूक न करता गुंतवणूकदार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करतात, तसेच सोन्याचे सुद्धा आहे. कारण गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून तिथे जोखीम नाममात्र आहे. तरीसुद्धा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट आणि डेरिव्हेटिव्हजच्या वापराद्वारे सोन्याचा बाजार हा सुद्धा इतर बाजाराप्रमाणेच अस्थिर दिसून येतो.

डिजिटल गोल्ड च्या शुद्धतेचे प्रमाण काय आहे | Digital Gold Purity

डिजिटल गोल्ड च्या स्वरूपामध्ये सोने खरेदी करण्याचा एक फायदा म्हणजे, इथे तुम्हाला अशुद्ध सोने मिळण्याचा मार्ग बंद होतो. कोणत्याही डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म किंवा ॲप व वेबसाईटवर तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी शुद्ध 24K सोने उपलब्ध असते, व तुम्ही त्याच किमतीमध्ये डिजिटल गोल्ड त्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता. हे सर्वात मोठं शुद्ध सोन्याचं प्रमाण डिजिटल गोल्ड च्या माध्यमातून मिळतो. त्यामुळेच इथे कमी किंवा जास्त भेसळ प्रकार सोन्यामध्ये अजिबात आढळून येत नाही.

डिजिटल गोल्ड च्या खरेदीसाठी कोणता प्लॅटफॉर्म योग्य आहे

मार्केटमध्ये डिजिटल गोल्ड च्या खरेदीसाठी विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या अटी व शर्ती ह्या वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला जर डिजिटल बोर्ड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर योग्य व सुरक्षित डिजिटल गोल्ड चा प्लॅटफॉर्म बघणे गरजेचे आहे. जसे की तुम्ही पेटीएम, गुगल पे, फोन पे किंवा तुमच्या विश्वासार्ह प्लॅटफॉर्म वर किंवा वेबसाईटवर जाऊन डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. संपूर्णपणे शहानिशा करून व अटी शर्ती बघूनच गुंतवणूक करायला हवी.

1 thought on “डिजिटल सोने कसे खरेदी करावे, डिजिटल सोने खरेदी करण्याचे प्रकार | How To Buy Digital Gold | Types Of Buy Digital Gold”

Leave a comment