महाराष्ट्र सरकार आपला दवाखाना योजना माहिती | Maharashtra government ‘Aapla Davakhana’ health scheme

महाराष्ट्र सरकार आपला दवाखाना ही महाराष्ट्र शासनाची नवीनच सुरू झालेली योजना आहे, या योजनेमध्ये पात्र व्यक्तीसाठी खुप फायदे आहेत, आपण खाली या योजनेचे स्वरूप व सर्व फायदे तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करावा या योजनेसाठी कोण कोण पात्र होईल ही योजना कशा स्वरूपाची आहे हे सर्व खाली बघणार आहोत. Aapla Dawakhana Yojana Mahiti Marathi Madhe

एकनाथ शिंदे सरकारने मुंबई सोबतच संपूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्र सरकार आपला दवाखाना ही अफलातून योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 600 ते 700 आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : नमस्ते योजना काय आहे ? नमस्ते योजनेची संपूर्ण माहिती,फायदे,वैशिष्ट्ये

महाराष्ट्र सरकार आपला दवाखाना ही योजना काय आहे | what is the Maharashtra government health scheme

मुंबई महानगरपालिका व शिंदे सरकारने ही योजना अमलात आणली आहे. मात्र सद्यस्थितीत बघता ही योजना फक्त ठाणे व मुंबई या ठिकाणी सेवा देईल. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये या योजनेचा सर्व स्तरातील लोकांना फायदा देण्यात येईल असा आश्वासनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल आहे.

नेहमी मुंबई सोबत राज्यामधील महापालिका तसेच सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी प्रचंड गर्दी आढळून येते, अगदी कुणाला सर्दी ताप थंडी अशा साधारण आजारासाठी सुद्धा मोठे हॉस्पिटल गाठावे लागतात व बराच खर्च तेव्हा येतो. हे सर्व लक्षात महापालिकेने असा निर्णय घेतला आहे की 20 – 30 हजार वस्तीला मिळून एक आरोग्य केंद्र असावं हे राज्य सरकारचं लक्ष आहे.

महाराष्ट्र सरकार आपला दवाखाना योजने अंतर्गत काय सवलती मिळतील Major Benefits Under The Maharashtra Government Health Scheme

  • या योजनेमध्ये कोणत्या व कशा स्वरूपातील सेवा रुग्णांना मिळतील हे आपण खाली बघू
  • या योजनेच्या माध्यमातून 25 -30 हजार लोक वस्ती असणाऱ्या ठिकाणी आरोग्य केंद्र असाव असं ध्येय ठरवण्यात आलेल आहे.
  • सकाळच्या 7 वाजेपासून दुपारच्या 2 वाजेपर्यंत तर 3 वाजेपासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत या योजने अंतर्गत सुरू केलेले आरोग्य केंद्र हे चालू राहतील
  • महाराष्ट्र सरकार आपला दवाखाना योजनेच्या माध्यमातून 147 प्रकारच्या वेगवेगळ्या वैद्यकीय संपूर्ण चाचण्या मोफत करून दिल्या जातील अशी माहिती सुद्धा महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
  • पोर्ट केबिन मध्ये सुद्धा काही ठिकाणी प्राथमिक उपचार घ्यायला आरोग्य केंद्र सुरू केले जाईल.
  • यासोबतच जे पॉली क्लिनिक आहे त्यामध्ये वैद्यकीय तज्ञांद्वारे मोफत वैद्यकीय सल्ला दिला जाईल व त्यासोबत उपचार मिळेल असेही पालिकेने सांगितले.
  • महानगरपालिकेचे जे डायग्नोस्टिक सेंटर आहे त्याच्या अंतर्गत एक्स-रे सिटीस्कॅन एम आर आय यासारख्या महागड्या चाचण्या मोफत करून दिल्या जातील.
  • योजनेअंतर्गत सुरू केलेल्या दवाखान्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी असेल व एक परिचारिका तसेच एक फार्मसीस तर एक मदतनीस राहील, या चारही पदांची निवड ही कंत्राटी माध्यमातून करण्यात येईल असं सुद्धा सांगितलं आहे.
  • स्त्री रोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, दंत रोग, तज्ञ बालरोग तज्ञ, व कान नाक घसा तज्ञ ENT तसेच स्त्रीरोग तज्ञ फिजिओथेरपीस्ट या सर्वांच्या सुविधा आरोग्य केंद्रा मार्फत पुरवल्या जातील.
  • महाराष्ट्र सरकार आपला दवाखाना ही योजना ग्रामीण भागामध्ये एसटी स्टँड च्या जवळ सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे

महाराष्ट्र शासन आपला दवाखाना या योजनेमध्ये आव्हान | Challenges In Maharashtra Fovernment Health Scheme

गेल्या कितीतरी वर्षापासून मुंबई महानगरपालिका व राजकारण हा विषय, बऱ्याच अभ्यासकांचे म्हणणं होतं की ही योजना खूप दिवसा अगोदर चालू व्हायला हवी होती. तसेच मुंबईमध्ये व महाराष्ट्र मध्ये जिथे जिथे झोपडपट्टी भाग आहे त्या ठिकाणी आरोग्याची खूपच प्रारंभळ नेहमी उडताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य केंद्र त्या त्या भागामध्ये असायलाच हवं.

महाराष्ट्र शासन आपला दवाखाना या योजनेपुढे आता हे आव्हान आहे की किती मागासलेल्या भागापर्यंत ही योजना पोहोचेल व योजनेमध्ये सांगितलेल्या ज्या सेवा आहेत त्या मिळतील. असे असले तरी महाराष्ट्र सरकार जास्तीत जास्त आवश्यकता असलेल्या भागांमध्ये लवकरात लवकर या योजनेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र सुरू करणार आहेत.

महाराष्ट्र शासन आपला दवाखाना योजना कोठे कोठे चालू होईल | Where Will Open Maharashtra Government Health Scheme

शिंदे सरकारने या अगोदरच अशी घोषणा केली आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात येईल, त्यासाठी काही शिष्टमंडळ कामाला सुद्धा लागलेली आहेत. ही सर्व माहिती गोळा करून लवकरात लवकर सर्व तालुक्यांमध्ये जिथे खरंच गरज आहे अशा ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्यात येईल असं सांगितलं जातंय

कमीत कमी 25 ते 30 हजार लोकसंख्या केंद्रित असलेले ठिकाण या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या भागातील सर्व लोकसंख्या येथे स्थापित झालेल्या आरोग्य केंद्राचा उपभोग घेऊ शकते.

महाराष्ट्र शासन आपला दवाखाना योजनेचे मुख्य वैशिष्ट्य | Maharashtra Government Health Scheme Features

महाराष्ट्र शासन आपला दवाखाना ही योजना मुळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी स्वरूपात राबवण्यात आलेली आहे. शिंदे सरकारने या निर्णयावर स्वाक्षऱ्या करून या योजनेला हिरवा झेंडा दाखवला .

या योजनेचे एकूण स्वरूप हे गरजूंना दवाखान्यासाठी इकडे तिकडे हेडसांड करावी लागू नये तसेच गरीब वस्ती वाड्यावर छोट्या छोट्या आजारांसाठी सुद्धा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात, अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा गरिबांना उपचार घेणे शक्य नसतं ही निकड ओळखून सरकारने या योजनेला ग्रीन सिग्नल दाखवले आहे.

मुंबई हे दाटीवाटीचे शहर आहे, मुंबईमध्ये जेवढे उच्चभ्रू व्यक्ती आहेत तेवढ्याच प्रमाणात गरीब व्यक्ती सुद्धा, राजकीय पक्ष मुंबईमधील झोपडपट्टी भाग तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही असे लोक यांची दवाखान्यासाठी व एकंदरीत परिस्थितीवर होणारी वाताहत, या विषयावर एकमेकांवर नेहमी तोंड सुख घेत. यावरून तिथे आरोग्य केंद्र असणे किती गरजेचे आहे हे लक्षात येते.

ही योजना सुरुवातीला मुंबईच्या आसपासच्या झोपडपट्ट्या तसेच तातडीने आरोग्य केंद्र आवश्यक असलेल्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात येणार आहे व बऱ्याच अंशी याचं काम सुद्धा शासनाने सुरू केलेलं आहे.

निष्कर्ष – महाराष्ट्र शासन आपला दवाखाना योजना ही महाराष्ट्र शासनाने चालू वर्षामध्ये काढलेली आर्थिक रीतीने सक्षम नसलेल्या व्यक्तींसाठी तसेच गरजू व गरिबांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी योजना आहे. सर्व स्तरातील व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात. या योजनेसाठी जी पात्रता लागेल त्या पात्रतेनुसार कागद पत्र जवळ बाळगून ठेवावेत व या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या महा ईमेल सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा माहिती घेऊ शकता तसेच तिथून यासाठी अर्ज करण्याची गरज असेल तर अर्जही करू शकता.

1 thought on “महाराष्ट्र सरकार आपला दवाखाना योजना माहिती | Maharashtra government ‘Aapla Davakhana’ health scheme”

Leave a comment