आपण किती किलोमीटर चालतो, किती पळतो व किती व्यायाम करतो ते पाहण्यासाठी कोणते ॲप उत्तम आहे?

किती किलोमीटर चालतो, किती पळतो व किती व्यायाम करतो ते पाहण्यासाठी कोणते ॲप उत्तम आहे?हल्लीची झालेली धावपळीची जीवनशैली ही येणाऱ्या काळामध्ये मानवाला आव्हान करत आहे. मात्र माणूस जसा जसा प्रगती करत आहे त्याच प्रकारे त्याला आरोग्य विषयी मिळणाऱ्या आव्हानांना सामोरे कसं जायचं याविषयी जास्त प्रश्न पडताना दिसत आहे, जेवढे अधिक प्रमाणामध्ये मानवाला आव्हान पेलावे लागतात तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये तो त्या समस्यांवरती काहीतरी तोडगा काढण्याच्या प्रयत्न करत असतो.

मार्केटमध्ये म्हणजेच ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपण किती चालतो किंवा किती पडतो व किती व्यायाम करतो यासाठी असंख्य वेगवेगळ्या स्वरूपाचे ॲप आहेत, मात्र पुन्हा प्रश्न पडतो की महत्त्वाचे व योग्य ॲप कोणते आहे. तुम्हाला ज्या ॲप मध्ये तुमच्या चालण्याचा पाळण्याचा किंवा व्यायामाचा जो डाटा दाखविल्या जातो तो कितपत खरा आहे किंवा त्यामध्ये काय सत्य आहे, हेही महत्त्वाच ठरतं.

फक्त चालनच महत्त्वाचं नाही किंवा व्यायाम करणं महत्त्वाचं ठरत नाही यासोबत तुम्ही चालन्यामुळे किंवा पळन्यामुळे तसेच व्यायाम केल्यानंतर तुमच्या शरीराच्या किती कॅलरी जळतात यावरती तुम्हाला मिळणाऱ्या फायद्याचा आलेख अवलंबून असतो. तुम्ही केलेल्या व्यायामामुळे मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो त्यापासून तुमच्या शरीरातील जळलेल्या कॅलरी तुमच्या शरीराला निरोगी आकार देत असतात.

खाली आपण चालताना आपल्या पावलांची संख्या मोजण्यासाठी तसेच शरीराच्या किती कॅलरी जळाल्या ते मोजण्यासाठी व किती शारीरिक श्रम आपण व्यायामात केले हे बघण्यासाठी काही ॲप ची माहिती घेणार आहोत.

1) गूगल फिट (Google fit)

सर्वप्रथम आपण गुगल फिट विषयी माहिती बघणार आहोत, सर्रासपणे सर्वांच्याच मोबाईल मध्ये असलेले हे एक कॅलरी जाळण्याचे चांगले ॲप समजल्या जाते. या ॲपमध्ये वापरकर्त्यांसाठी विविध सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये खास करून दिवसभरामध्ये आपण किती पावलं चाललो याची संख्या आपण त्यामध्ये बघू शकतो.

फक्त चालण्यासाठीच नाही तर पळताना किती वेळा मध्ये आपण किती पळालो हे सुद्धा तिथे बघता येते. चालन्यामुळे किवा पळण्यामुळे किती कॅलरी शरीराने घालवल्या याचा एक आलेख सुद्धा तिथे ठळकपणे दाखविला जातो. ज्यामुळे आपण चालणे या व्यायाम प्रकाराच ठरवलेल लक्षित ध्येय योग्य रीतीने गाठू शकतो.

या ॲपमध्ये जेव्हा तुम्ही वेळ ठरवता व त्या योग्य वेळेत तुम्हाला तुमचं चालण किंवा पळण पूर्ण करायच असत मात्र अचानक तुम्हाला मध्येच विश्रांती घेण्याची गरज पडली किंवा तुम्ही काही कारणामुळे थांबलात तर ठरवलेल्या वेळेला तुम्ही थांबवू शकता व जेव्हा पुन्हा चालणे सुरू कराल तेव्हा सुरू करू शकता. या दोन्ही मधला वेळ कॅलरी जाळण्यामध्ये पकडल्या जात नाही.

2) मॅपमायरन (Mapmyrun)

या ॲपमध्ये एक विशेष सुविधा अशी आहे ज्यामध्ये तुम्ही जेव्हा फिरण्यासाठी किंवा पळण्यासाठी बाहेर जातात तेव्हा नवीन ठिकाणी तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही कुठे फिरत आहात किंवा कुठे पळत आहात अशा परिस्थितीमध्ये या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचं लोकेशन ट्रॅक करू शकता ज्याच्यामुळे तुम्ही नेमक्या कोणत्या स्थानावर आहात हे तुमच्या लक्षात येईल.

पळण्यासाठी एक दुसरे वैशिष्ट्य म्हणजे Mapmyrun मधे तुम्ही किती वेळात किती किलोमीटर किंवा किती मीटर धावता याचा मोजमाप काढून त्यापासून तुमच्या शरीराची किती कॅलरी जळाली व कोणकोणते फायदे होऊ शकतात हे सर्व तिथे आपण बघू शकतो.

3) नाईक रन क्लब (Nike Run Club)

जवळपास असं कोणीही नाही त्यांना जगप्रसिद्ध नाईक कंपनी विषयी माहित नसावं, प्रत्येकालाच या कंपनीविषयी व कंपनीच्या विविध वेगवेगळ्या स्वरूपातील उत्पादनांविषयी थोडी तरी माहिती असतेच. या कंपनीचे जास्तीत जास्त उत्पादन आहे खेळाडूंसाठी असल्यामुळे, खेळाडूंसाठी आणखी नाविन्यपूर्ण काय करता येईल याचा विचार करून कंपनीने Nike Run Club हा प्लॅटफॉर्म ॲपच्या रूपाने बाजारामधे आणलाय.

या ॲप मध्ये फक्त चालण्यासाठी व पळण्यासाठीच सुविधा आहेत असं नाही तर या सोबतच या ॲपमध्ये हृदयाचे ठोके नाडीचे ठोके तसेच उंची व स्थान सुद्धा यामध्ये मोजता येते. शरीराच्या कोणत्या अवयवापासून आपण किती व्यायामाचे श्रम घेतले हे सुद्धा विशिष्ट व्यायाम प्रकार करून त्यानंतर त्या माध्यमातून किती कॅलरी जळल्या याचा अंदाज काढून करता येते.

या ॲपमध्ये कोणत्या अवयवासाठी कोणता व्यायाम प्रकार हा सर्वोत्तम आहे व त्याचे फायदे काय काय आहेत याचे एक पत्र सुद्धा मिळते. ज्यामुळे योग्य रीतीने चालण्यात व पळण्यात फायदा होतो, जेणेकरून चालणे वा पळणे या व्यायाम प्रकाराला सातत्य मिळते व शारीरिक आरोग्य उत्तम राखता येते.

4) झ्विफ्ट (Zwift)

Zwift हे ॲप खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले आहे. खास करून ज्यांना सातत्याने दररोज चालण्याची व पळण्याची आवड आहे अशा सर्व गटातील व्यक्तींसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म Zwift च्या रूपाने समोर येत आहे, व दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये नव्यानेच आलेले हे ॲप आहे. वापरण्यासाठी ही खूप सोपे आहे.

ज्या व्यक्तींना एकत्रित व्यायाम करायला आवडत त्यांच्यासाठीही हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे कारण या प्लॅटफॉर्म वरती बऱ्याच वेळा एकत्रित व्यायाम सत्र आयोजित केल्या जातात ज्या माध्यमातून एकमेकांना बघून व्यायामाविषयीचे वेगवेगळे ध्येय धोरण ठरवता येतात व व्यायाम करायला गोडी निर्माण होते ज्या माध्यमातून चालणे फिरणे अशा व्यायाम प्रकाराला वाव मिळते.

एकत्रित व्यायाम करायचा दुसरा फायदा असाही आहे, व्यक्ती एकटे एकट्याने सातत्याने व्यायाम करू शकेलच असं नाही. जेव्हा सार्वजनिक रित्या सर्वजण चालणे फिरणे हे व्यायाम प्रकार एकमेकांसोबत शेअर करत असतात तेव्हा विविध गोष्टींची देवाणघेवाण होते ज्याच्यामुळे व्यायाम करण्याची आवड आणखीन दृढ होते. आज दिवसभरामध्ये किती पावलं आपण चाललो किंवा किती शारीरिक श्रम घेतले व त्या माध्यमातून किती कॅलरी जळल्या हेही एकमेकांसोबत शेअर केलं जाऊ शकत.

5) C25K 5K ट्रेनर (C25K 5K Trainer)

जे व्यायाम करण्यामध्ये नवीन आहेत ज्यांना माहीतच नाही की चालण्याचा किंवा पळण्याचा व्यायाम प्रकार कसा सुरु करावा अशांसाठी C25K 5K Trainer वरदान ठरू शकतो. यामध्ये कुठलंही ज्ञान नसलेले व्यक्ती सुद्धा अगदी सुरुवातीपासून व्यायाम प्रकार शिकू शकता व त्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा आपल्या शरीरासाठी कसा मिळवायचा याचं नियोजन करू शकता.

अल्पावधीतच या ॲपने प्ले स्टोअर वर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करते मिळवले आहेत. जे व्यक्ती 5 किलोमीटर 6 किलोमीटर असं ध्येय ठेवून पळायला सुरुवात करतात त्यांना विशेष करून हे ध्येय कसं गाठायच त्यासाठी पूर्वनियोजन कसा असावा याचा सर्व मार्गदर्शन या प्लॅटफॉर्मवर केल्या जात, ज्याचा फायदा पळण्यासोबतच चालण्यामध्ये सुद्धा होतो जिथे किती वेळात किती मीटर किंवा कि.मी आपण पळलो हे दाखवल्या जात.

6) रणगो (Rungo)

Rungo चे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपण चालण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा बऱ्याच वेळा रस्त्यात येणारे दुसरे वळण रस्ते आपल्याला कळत नाही ज्याच्यामुळे नवीन ठिकाणी रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते, व व्यायाम करताना हा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. Rungo या ठिकाणी योग्य दिशा दाखवण्यासाठी तसेच तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करते.

Rungo मधे तुम्हाला कोणत्या दिशेला जायचे आहे तुमच्या पासून ते अंतर किती मीटर किंवा किलोमीटर आहे हे सर्व तुम्हाला प्लॅटफॉर्म मध्ये दाखवल्या जाते, ज्याच्या मदतीने तुम्ही आणखीन योग्य रीतीने कुठलाही अडथळा पार करून पुढे जाऊ शकता व तुमच्या व्यायामाचे निश्चित ध्येय गाठू शकता या ठिकाणी तुमचा वेळ व अनावश्यक श्रम दोन्ही वाचते.

हे पाहून चालण्याची किंवा पळण्याची गती मोजण्यासाठी योग्य ॲप ठरवा

ॲपचे रिव्ह्यू.

ॲपला दिलेली रेटिंग.

मोबाईल डेटा ची गरज आहे की नाही.

ॲप किती एमबीचे आहे.

जास्तीत जास्त सुविधा काय आहेत.

दिलेले गुणोत्तर बरोबर आहे का.

हे सर्व बघून त्यानंतर तुमच्या शारीरिक व्यायामानुसार तुम्ही कुठलेही ॲपची निवड करू शकता, वरील निकष बघितल्यामुळे तुम्हाला नेमके जे वैशिष्ट ॲप मधे हवे असेल ते मिळू शकते.

Leave a comment